कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवर EPFO व्याजदराबाबत महत्त्वाची घोषणा आज ( दि. २८ ) करण्यात आली. EPFO व्याजदर ८.१५ टक्केकरण्यात आला आहे, अशी सूत्रांनी दिली. नवीन व्याजदर हा आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी असेल. तीन वर्षांनंतर ईपीएफ व्याजदरात वाढ झाली असून ६ कोटींहून अधिक सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवर ( ईपीएफ ) यंदाच्या आर्थिक वर्षात किती व्याज मिळणार याकडे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ( ईपीएफओ ) सुमारे ६ कोटी सक्रिय सदस्यांचे लक्ष लागले होते. कारण सध्या हा व्याजदर ८.१ टक्के होतो. नवीन व्याजदर ८.१५ हा आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी असेल.
‘ईपीएफओ’ने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ८.१ टक्के व्याजदर निश्चित केला होता. तो मागील चार दशकांमधील सर्वात निच्चांकी व्याजदर ठरला होता. १९७७-७८मध्ये ईपीएफवरील व्याजदर ८ टक्के होता. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये पहिल्यांदा ईपीएफमध्ये जास्त गुंतवणूक करमर्यादेत येत असल्याने आजची बैठक ही महत्त्वपूर्ण मानली जात होती.