• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एकात्मिक फलोत्पादन विकास योजना : कांदाचाळीमुळे मिळाली शाश्वत उत्पन्नाची हमी

Our Media by Our Media
March 27, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, योजना, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
86 1
0
एकात्मिक फलोत्पादन विकास योजना : कांदाचाळीमुळे मिळाली शाश्वत उत्पन्नाची हमी

कांदा चाळ

12
SHARES
624
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.२७ :- एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत खेर्डा बु. येथील शेतकरी दिनेश अवचितराव काकड यांनी कांदाचाळ उभारली आहे. बाजारभावातील चढ-उतार पाहता आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कांदा पिकाची शास्त्रीय पद्धतीने साठवणूक करता यावी, हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कांदा चाळ उभारणी आवश्यक ठरते. त्यासाठी शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी अनुदान दिले जाते.

कांद्याची शास्त्रशुद्ध साठवण

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

खेर्डा बु. येथील शेतकरी दिनेश अवचितराव काकड यांनी आपल्या शेतात कांदा चाळ उभारली. सन २०२२-२३ साठी त्यांना ८६ हजार ८३ रुपये इतके अनुदान मिळाले. त्यांनी दीड हेक्टर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केली आहे. कांद्याच्या बाजारभावातील चढ-उतार पाहता कधी कधी लागवड खर्च ही निघण्याची शाश्वती बाळगता येत नाही. अशावेळी पडत्या दराने पिक विकण्यापेक्षा ते साठवून ठेवणे अधिक योग्य.  त्यासाठी काकड यांनी ही चाळ उभारली आहे. पिकाचे काढणीत्तोर व्यवस्थापन होणे आवश्यक असते. त्यासाठीही कांदाचाळ अत्यावश्यक असून शेतकऱ्यांना मालाची प्रतवारी करणे, विरळणी करणे शक्य होते. कांदाचाळ ही कांदा साठवणूकीची शास्त्रीय पद्धत म्हणून सर्वश्रृत आहे.

२५ मे.टन कांद्याची साठवण

 या चाळीत २५ मेट्रिक टन इतका कांदा साठवता येणार आहे. ही चाळ त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेली असल्याने त्यात कांदा साठवण, त्याची प्रतवारी करणे, शिवाय वाहतुकीसाठी वाहन नेण्याइतपत जागा त्यांनी तयार केली आहे. त्यामुळे वाहनात माल भरणे, काढणे इ. कामे सुलभ पद्धतीने करता येतात.  यंदाही त्यांनी कांदा पिक घेतले आहे. उत्पादित कांदा सध्या चाळीत ठेवणार आहेत. योग्य बाजार भाव आल्यावर विक्री करणार आहेत. साहजिकच पिकवलेल्या मालाचा योग्य भाव मिळाल्याने त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास योजना

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा भाग म्हणून ही योजना राबविली जाते. वैविध्यपूर्ण हवामान विभागानुसार प्रादेशिक  अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन त्या त्या भागात फलोत्पादनाला चालना दिली जाते. त्यात संशोधन, तंत्रज्ञान प्रसार, विस्तार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा देऊन समुह पद्धतीने विकास केला जातो. यात शेतकऱ्यांचे एकत्रिकरण करणे हा महत्त्वाचा घटक आहे.  त्याद्वारे फलोत्पादनात वाढ करणे, उत्पन्नात वाढ करुन आहार विषयक सुरक्षा बळकट करण्यात येते.यात सुक्ष्म सिंचनाला चालना दिली जाते. जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती असून त्यासमितीमार्फत योजनेचा प्रसार व शेतकऱ्यांची निवड करणे आदी बाबी करण्यात येतात, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर यांनी दिली. कांदा चाळ ही बाब काढणीत्तोर व्यवस्थापन म्हणून या योजनेत समाविष्ट आहे,असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अकोला विमानतळावर स्वागत

Next Post

EPFO Updates : EPFO व्‍याजदरात वाढ, जाणून घ्‍या नवीन व्‍याजदर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
epfo

EPFO Updates : EPFO व्‍याजदरात वाढ, जाणून घ्‍या नवीन व्‍याजदर

विभागीय आयुक्त भेट

विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केली कचरा डेपो; नेहरु पार्क जवळील अपघातप्रवण स्थळाची पाहणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.