तेल्हारा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील आरसुळ येथे वीटभट्टीवर काम करणाऱ्या परराज्यातील मजुराने दारूच्या नशेत पत्नीला ठार मारल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे आहे की आरसुळ येथील स्वामी ब्रिक्स येथे गेल्या दोन महिन्यांपासून वीटभट्टी वर मजुरीसाठी फरिदाबाद उत्तर प्रदेश येथून आलेल्या अरविंदकुमार हा आपल्या पत्नी दोन मुलासह मजुराने काम करीत होता. काल दि १५ फेब्रुवारी च्या रात्री आरोपी अरविंदकुमार ने मनसोक्त दारू ढोसली त्यानंतर त्याच्या पत्नीचे सरोजदेवी (३७) व आरविंदकुमार (३५) यांच्यात कुठल्यातरी कारणावरून भांडण झाले भांडण एवढे विकोप्याला गेले की आरोपीने लाकडी काठीने त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली.
यामध्ये डोक्यावर तसेच हातापायावर गंभीर दुखापत झाल्याने जाग्यावरच त्याची पत्नी मृत झाली. पत्नी मृत झालेचे समजले तेव्हा सकाळ पर्यंत आरोपी हा मृतदेहाच्या बाजूला बसून होता वीटभट्टी वरील इतर मजूर सकाळी उठले तेव्हा त्यांना हा भयंकर प्रकार लक्षात आला यावेळी तेल्हारा पोलिसांना याबाबत माहिती दिली असता आपल्या ताफ्यासह पोलीस वीटभट्टी वर दाखल होऊन पंचनामा केला. याप्रकरणी वीट भट्टीवरील दिवानजी राम वाकोडे यांच्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास प्रभारी ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे,पो कॉ रोशन ठाकूर हे करीत आहेत.