• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दहावी व बारावी परीक्षेकरिता ‘कॉपीमुक्त अभियान’राबवा जिल्हाधिकारी निमा अरोरा निर्देश

Our Media by Our Media
February 16, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, नोकरी, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
150 1
0
‘कॉपीमुक्त अभियान’
22
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१६ :- इयत्ता बारावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी तर इयत्ता दहावीची परीक्षा दि.२ मार्च पासून सुरु होत आहे. या दोन्ही परीक्षेत ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्याचे शासनाच्या निर्देश आहे. त्याअनुषंगाने शासकीय यंत्रणेने समन्वय साधून कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्या संदर्भात आज दक्षता समिती सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधिक्षक संदिप घुगे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, डायटचे प्राचार्य डि.डि. नागरे, उपशिक्षाणाधिकारी संध्या महाजन आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

इयत्ता १२ वी अर्थात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व इयत्ता १० वी अर्थात माध्यमिक शालांत परीक्षा सुरु होत आहे. या परिक्षेत कॉपीमुक्त अभियान राबवायचे असून या संदर्भात शासनाने दि.१४ फेब्रुवारी २०२३ परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकातील सुचनांप्रमाणे सामुहिकरित्या हे अभियान राबवावयाचे आहे. प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या एकजूटीने या अपप्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यावेळी केले.

शासन परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे: राज्याचे शिक्षण आयुक्त हे या अभियानाचे राज्याचे नोडल अधिकारी असून जिल्ह्यात जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी आहेत. जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) हे या अभियानाचे जिल्हास्तरावरील समन्वय अधिकारी आहेत. या संदर्भात शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अर्थात सर्व जिल्हा प्रशासनाने हे अभियान एकत्रित राबवावे. या परीक्षेच्या बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी परीक्षा कक्षात प्रवेश करु नये अशा सुस्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत.  केवळ परीक्षा केंद्राच्या  परीघीय भागातच बंदोबस्ताचे काम पार पाडावे.  विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या अर्धातास आधी हजर रहावे.  संवेदनशील असलेल्या परीक्षा केंद्रांवर  चित्रीकरण करण्याची सुचना आहे.

शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या कार्यशाळा आयोजीत कराव्या, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी  यांची जिल्हा दक्षता समिती तयार करावी. तसेच शाळा व पालकांशी माध्यमांद्वारे संवाद साधावा.

परीक्षा केंद्राच्या ५० मिटर आत अनधिकृत व्यक्तिंना प्रवेश नाही. अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात यावे.  प्रतिबंधात्मक आदेश जारी करावेत. ५० मिटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत.

परीक्षा केंद्रात प्रवेशावेळी विद्यार्थ्यांची झडती घेण्यात येईल. पोलीस पाटील, कोतवाल, शाळेचे कर्मचारी यांच्याकडून मुलांची तर अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेच्या महिला कर्मचारी यांच्याकडून मुलींची तपासणी करण्यात येईल.

परीक्षा कालावधीत पूर्ण वेळ महसूल विभागाचे बैठे पथक नेमण्यात येईल.  हे पथक परीक्षेच्या १ तास आधी व १ तास नंतर (उत्तर पत्रिका ताब्यात घेईपर्यंत) उपस्थित असेल. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल.,  ज्यांचे मुळ गाव व कामाचे ठिकाण एकच असल्यास त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार नाही, या नियुक्त्यांमध्ये दररोज बदल करण्यात येईल.

प्रत्येक तालुक्यासाठी एक भरारी पथक नेमण्यात येईल. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांची नियुक्ती असेल. अचानक तपासणीचेही प्रावधान यात ठेवण्यात आले आहे. परीक्षा कालावधीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दौरे काढून परीक्षा केंद्रांना भेटी देतील.  संवेदनशील केंद्रांवर तसेच इंग्रजी, गणित, विज्ञान या पेपरसाठी भेटी या आकस्मिक असणार आहे.

Tags: 10th and 12th examinationAkolaNima Arora
Previous Post

Breaking – दारूचा नशा भारी पतीने धाडले पत्नीला यमसदनी,आरोपीला अटक

Next Post

मार्च महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Rashan Card

मार्च महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

Akola

जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती; अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.