अकोला, दि.20 :- जिल्ह्यासाठी माहे फेब्रुवारी महिन्यासाठी लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे.
वाटप परिमाण व दर याप्रमाणे-
१. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी गहू दोन किलो प्रतिव्यक्ती, मोफत
२. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ तीन किलो प्रतिव्यक्ती, मोफत
३. अंत्योदय अन्न योजना गहू-१५ किलो प्रति कार्ड, मोफत
४. अंत्योदय अन्न योजना तांदूळ-१५ किलो प्रति कार्ड, मोफत
५. नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांना लहानमोठा भेदभाव न करता साठ्याचे उपलब्धेनुसार एक किलो
प्रति शिधापत्रिका, २०रुपये प्रतिकिलो.
हे वाटप परिमाण गोदामातील साठ्याच्या व लाभार्थ्यांच्या संख्या उपलब्धतेनुसार राहील, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.