अकोला दि. 13 :- महाराष्ट्र राज्य विधि सेवा, मुंबई व जिल्हा व सत्र न्यायधिस यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध कोचिंग क्लासेसमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज सिद्धात कोचींग क्लासेस, अकोला येथील विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये दिवणी न्यायधिसच व्हि.एस.खांडबहाळे, विधीज्ञ पी.एम. तायडे, पीएसआय अनिता इंगळे यांनी पॉक्सो कायदा, सायबर क्राइम, मानवी तस्करी, कायदा व सुव्यवस्था व नैतिकता या विषयावर मार्गदर्शन केले.
अभियान यशस्वी करण्यासाठी कोचिंग क्लासेसचे संचालक श्री. पाध्ये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे डी. पी. बाळे, अधिक्षक संजय रामटेके, राजेश कृ. देशमुख, हरीश इंगळे, शिपाई, शाहीबाज खान यांनी विशेष परिश्रम घेतले.