अकोला दि. 3 :- जिल्ह्यामध्ये प्राण्यांवर होत असलेला अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांनी मंगळवार दि. 3 जानेवारी रोजी रॅलीव्दारे जनजागृतीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला प्राणी मित्र व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अकोला प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे राखी वर्मा यांनी केले आहे.
जनजागृती रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते होणार आहे. रॅलीचे प्रारंभ एसपीसीए रेस्कू सेंटर, अकोला आरएलटी कॉलेजपासून सुरु होवून टॉवर-गांधी चौक मार्गे परत एसपीसीए रेस्कू सेंटर, अकोला येथे समारोप हाईल. रॅलीमध्ये प्राण्यांच्या हक्क-अधिकारांचे संरक्षणासाठी फलक आणि घोषणांच्या माध्यमातून जागृती करण्यात येईल. रॅलीसंबधित अधिक माहितीसाठी 7385350701 या क्रमांकावर संपर्क साधावा.