• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

ग्रा.पं. निवडणूकः प्रशासन सज्ज

Our Media by Our Media
December 15, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
91 1
0
निवडणूक
14
SHARES
658
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.15 :- जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी प्रशासनाची सर्व सज्जता झाली आहे. आज निवडणूकीशी संबंधित सर्व विभागांचा आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तहसिलदार सुनिल पाटील, सहा. पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, तसेच तालुकास्तरीय सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, तसेच सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश देण्यात आले. शिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हिल चेअर आदी सुविधा उपलब्ध करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडावी,असे निर्देश यावेळी देण्यात आले.

निवडणूक शाखेमार्फत बैठकीत देण्यात आलेली माहिती याप्रमाणे-

निवडणूक व्हावयाच्या ग्रामपंचायती(निवडणूक कार्यक्रम जाहीर होतेवेळी)

जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात ६२ पैकी २३, अकोट-८४ पैकी ३७, मुर्तिजापूर-८६ पैकी ५१, अकोला- ९७ पैकी ५४, बाळापूर ६६ पैकी २६, बार्शी टाकळी- ८० पैकी ४७, पातूर- ५७ पैकी २८ अशा एकूण ५३२ पैकी २६६ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात सात सदस्यीय ग्रामपंचायती १९८, ९ सद्स्यीय ५५, ११ सदस्यीय ८, १३ सदस्यीय ३ तर 15 व 17 सदस्यीय प्रत्येकी एका ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाली त्यावेळी एकूण ८१७ प्रभागांमध्ये ही निवडणूक व्हावयाची होती व त्यात २०७४ सदस्यांची निवड करावयाची होती.

उमेदवारी अर्ज छाननी व माघारीनंतरची स्थिती

उमेदवारी अर्जांची छाननी व उमेदवारी माघारीनंतर जिल्ह्यात आता तेल्हारा तालुक्यात २३, अकोट- ३६, मुर्तिजापूर-५१, अकोला-५४, बाळापूर २६, बार्शीटाकळी-४७ तर पातूर-२८ अशा एकूण २६५ ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणूक होणार आहे. यात निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या ६७९ असून त्यातून १४७४ सद्स्यांची निवड व्हावयाची आहे. एकूण ५७१ सदस्य हे अविरोध ठरले आहेत, २९ ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यात एकूण अविरोध प्रभागांची संख्या १३८ आहे. सरपंच वगळता ५ ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य अविरोध झाले आहेत. त्यात तेल्हारा-१, अकोट-१, अकोला-३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सरपंचपदासाठी २५८ ठिकाणी निवडणूक

सरपंचपदासाठी २५८ जागांवर निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार अविरोध ठरले असून चार ठिकाणी सरपंचपदाकरीता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला नाही. एकंदर सरपंच व सदस्य असे मिळून १६९५ जण उमेदवारीच्या रिंगणात आहेत.

अविरोध सरपंच ठरलेल्या ग्रा.पं.- हिंगणी खु. ता. तेल्हारा, धामणगाव व अकोली जहांगिर ता. अकोट, उमरी ता. मुर्तिजापूर.

सरपंचपदासाठी एकही अर्ज प्राप्त न झालेल्या ग्रा.पं.-बांबर्डा ता. अकोट,भौरद ता. अकोला, परंडा ता. बार्शीटाकळी, गोधंडवाडी ता. पातूर.

धामणगाव ता. अकोट ही एकमेव ग्रामपंचायत संपूर्ण अविरोध(सरपंच व सदस्य) झाली आहे.

३ लाख ८ हजार ३१७ मतदार बजावणार हक्क

यानिवडणूकीत एकूण ३ लाख ८ हजार ३१७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात १ लाख ६१ हजार ६५९ पुरुष तर १ लाख ४६ हजार ६५४ महिला व ४ इतर मतदारांचा समावेश आहे.

तालुकानिहाय मतदार संख्या या प्रमाणे- तेल्हारा- ३११३४, अकोट- ५२०७९, मुर्तिजापूर-५८६८४, अकोला- ५६९२४, बाळापूर-२७१८५, बार्शीटाकळी-४८३३२, पातूर-३३९६२. जिल्ह्यात एकूण २५९९ दिव्यांग मतदार आहेत.

निवडणूक यंत्रणा- यानिवडणूकीसाठी एकूण मतदान केंद्र ८३२ असून त्यातील संवेदनशील मतदान केंद्र १७९ आहेत. (संवेदनशील मतदान केंद्र तालुकानिहाय- तेल्हारा-७, अकोट-४२, मुर्तिजापूर-५१, अकोला-९, बाळापूर-१२, बार्शीटाकळी-३३, पातूर-२५.) निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ३८७६ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४२९३ मनुष्यबळ संख्या उपलब्ध करण्यात आली आहे.

मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेली तालुकानिहाय ठिकाणे याप्रमाणे-

तेल्हारा- नवीन तहसिल कार्यालय, गाडेगाव रोड, तेल्हारा., अकोट- नवीन तहसिल इमारत, पोपटखेड रोड, अकोट., मुर्तिजापूर- नवीन शासकीय धान्य गोदाम, मुर्तिजापूर., अकोला- शासकीय धान्य गोदाम, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला., बाळापूर- शासकीय धान्य गोदाम, बाळापूर., बार्शीटाकळी- पंचायत समिती सभागृह, बार्शी टाकळी., पातूर- तहसिल कार्यालय, पातूर.

यानिवडणूकीसाठी रविवार दि.१८ रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० (अखंड).

मतमोजणी मंगळवार दि.२० रोजी होणार आहे.

Top 100 New Year Wishes 2023

Previous Post

विशेष लेखः- हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन

Next Post

पशुसंवर्धन विभाग;विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करा

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Pashusavardhan

पशुसंवर्धन विभाग;विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करा

अल्पसंख्याक दिन

अल्पसंख्याक दिनानिमित्त विविध उपक्रम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.