तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्राम बेलखेड येथील अल्पभूधारक ३५ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम बेलखेड येथील दिगंबर हरीचंद्र कुयटे या अल्पभूदारक शेतकऱ्याकडे जेमतेम दीड एकर जमीन होती त्यामध्ये शेती पिकवण्यासाठी सावकाररुपी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी काही महिन्यांपूर्वी अर्धा एकर शेत विकून सर्व काही निल केले मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि बँकेचे कर्ज यामुळे मानसिक दुविधेत सापडलेल्या दिगंबर याने दि १३ डिसेंबर रोजी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली मृतक डिगंबर यांच्या पश्चत आई वडील पत्नी मुलगा मुलगी असा आप्त परिवार आहे अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.