ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या प्रकृती संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली.
दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची दिलासादायक माहिती दिली आहे. ‘त्यांच्या प्रकृतीमध्ये हळु हळु सुधारणा होत आहे. ते डोळे ही उघडत आहेत. पुढच्या ४८ तासात व्हेंटिलेटरची पण गरज भासणार नाही. तसेच बीपी आणि हृदयाची क्रिया सुरळीत सुरू आहे. ‘ असे मेडिकल बुलेटीनमध्ये दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क याडगीकर यांनी सांगितले आहे.