PM Kisan Yojana : अलीकडच्या काळातील हवामान संकट आणि तंत्रज्ञानातील वेगवान प्रगतीला प्रतिसाद म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालय पंतप्रधान पीक विमाअंतर्गत शेतकर्यांच्या हिताचे बदल करण्यात आले आहेत.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा यांनी सांगितले की, हवामानसंबंधीच्या आपत्तीचा शेतीवर थेट परिणाम होत आहे. त्यामुळे देशातील असुरक्षित शेतकर्यांचे लहरी हवामानापासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पीक विम्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी देशातील शेतकर्यांना पुरसे विमा संरक्षण देण्यासाठी पीक आणि अन्य प्रकारच्या ग्रामीण कृषी विमा उत्पादनांवर अधिक भर देण्याची गरज आहे. 2016 मध्ये पंतप्रधान पीक विमा सुरू झाल्यानंतर या योजनेचे पेरणीपूर्व कालावधीपासून पीक कापणीच्या कालावधीपर्यंत सर्व पिके आणि धोक्यांसाठी सर्वसमावेशक संरक्षण उपलब्ध करून दिले आहे.
जे राष्ट्रीय कृषी विमा योजना आणि सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजनेच्या यापूर्वीच्या समाविष्ट नव्हते. 2018 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांदरम्यान अनेक नवीन मूलभूत वैशिष्ट्येदेखील यात जोडण्यात आली आहेत.