अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) हे आयसीयूमध्ये आहेत. ते व्हेंटिलेटर वर आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधार व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. असं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगिकर यांनी माध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या अफवेच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त काल (दि.२३) रात्री पासून येत आहे. मात्र त्यांच्या कुटूंबिंयाकडून निधनाच्या (Vikram Gokhale Health Update) वृताबाबत नकार देण्यात आला. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगिकर यांनी माध्यमांना सांगितले की, अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) हे आयसीयू मध्ये आहेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधार व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरु होते. बुधवारी त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर उपचारांना ते प्रतिसाद देणे थांबवले होते. त्यानंतर काल रात्रीपासून गोखले यांच्या निधनाचे वृत्त सगळीकडे पसरत आहे. दरम्यान, या वृत्तामुळे अनेक सिनेसृष्टीतील कलाकरांनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजलीही वाहिली.