• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘मायक्रोसॉफ्ट’ सोडून ‘मेटा’त गेली, दोनच दिवसांत नोकरी गेली

Our Media by Our Media
November 12, 2022
in Featured, ठळक बातम्या, नोकरी, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
107 1
0
Meta-Job-Fired
16
SHARES
770
VIEWS
FBWhatsappTelegram

हैदराबादमधील ‘मायक्रोसॉफ्ट’ मधील नोकरीचा राजीनामा दिल्यावर कॅनडात ‘मेटा’मध्ये कामावर रुजू झालेल्या भारतीय तरुणीला अवघ्या दोनच दिवसांत तीही नोकरी गमवावी लागली. ‘मेटाने काढलेल्या ११ हजार जणांच्या यादीत तिचे नाव असून, तिची अवस्था बिकट बनली आहे.

मार्क झुकेरबर्ग यांनी ‘मेटा’ कंपनीत कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला. एकूण कर्मचारी संख्येच्या १३ टक्के म्हणजे साधारणतः ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची घोषणा केली. हे करताना देशनिहाय तपशील दिलेला नाही. कपातीच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरू झाली आहे. अशाच एका नोकरी गमावलेल्या भारतीय तरुणीची कहाणी आता समोर आली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नीलिमा अग्रवाल असे तिचे नाव असून, तिने सोशल मीडियावर आपली आपबिती मांडली आहे. नीलिमा हैदराबाद येथे ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीत नोकरीला होती. तिथे दोन वर्षे काम केले. मोठ्या संधीच्या शोधात असलेल्या नीलिमाची काही महिन्यांपूर्वी ‘मेटा’ कंपनीत निवड झाली व तिला कॅनडात पोस्टिंग मिळाली. व्हिसा वगैरे अनेक किचकट बाबी पूर्ण करण्यात जवळपास महिना गेला.

अखेर ते पूर्ण केल्यावर ती कॅनडात पोहोचली. आठवडाभरानंतर ‘मेटा’मध्ये ती रुजूही झाली; पण अवघ्या दोनच दिवसांत तिला कंपनीच्या कर्मचारी कपातीचा फटका बसला. ११ हजार जणांच्या यादीत तिचे नाव असल्याने तिला कार्यमुक्त करण्यात आले. तिला आता तिथे दोन महिन्यांत नवीन नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत किंवा भारतात परत यावे लागणार आहे. आयुष्यातील अतिशय क्लेशकारक प्रसंग असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. असाच प्रकार विश्वजित झावाच्या बाबतीतही घडला. बंगळूरला ‘अॅमेझॉन मध्ये तीन वर्षे काम केल्यानंतर ‘मेटा’ कंपनीत नोकरी लागली. अमेरिकेचे कठोर नियम व वेळ खाणारी प्रक्रिया यांचा मुकाबला करीत अमेरिकेत तो दाखल झाला. ‘मेटा’मध्ये रुजू झाला आणि त्यालाही तिसऱ्याच दिवशी नोकरी गमवावी लागली. ‘मेटा’च्या तांत्रिक चमूत कार्यरत राजू कदम यांच्याबाबतीतही असाच प्रकार घडला. अमेरिकेत १६ वर्षांपासून राहणाऱ्या कदम यांची नोकरी गेली. २००८, २०१५ आणि २०२० या तिन्ही मंदींच्या लाटेत त्यांची नोकरी टिकून राहिली; पण आता अचानक ही घटना घडली.

Tags: JobMetaMicrosoft
Previous Post

चला निर्माण करूया, आपल्या अंगणात पक्षी अभयारण्य

Next Post

पक्षी सप्ताहानिमित्त शहरात पक्ष्यांच्या नावे आरोग्य ठेवा जपण्याचा स्तुत्य उपक्रम

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
health

पक्षी सप्ताहानिमित्त शहरात पक्ष्यांच्या नावे आरोग्य ठेवा जपण्याचा स्तुत्य उपक्रम

राष्ट्रीय लोक अदालत

राष्ट्रीय लोक अदालत; ९ हजार ७६ प्रकरणे निकाली: 26 कोटी 8 लाखांचा केला दंड वसूल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.