• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पक्षी सप्ताहानिमित्तः विशेष लेख- पक्षांची आंघोळ

Our Media by Our Media
November 9, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य, संपादकीय
Reading Time: 1 min read
86 1
0
occasion of Bird Week
13
SHARES
621
VIEWS
FBWhatsappTelegram

दिवसातला बराचसा काळ पक्षी चोचीने पिसे साफसुफ करतांना दिसतात. चोचीने साफसफाई करता येणार नाही अशा डोक्यावर व कानाचच्या जवळपासचा भाग पायांनी खाजवुन त्या भागाची साफसफाई करतात त्याच बरोबर पिसे व्यवस्थित करतात. याशिवाय दिवसातुन बऱ्याचदा गरजे प्रमाणे जलस्नान, सुर्यस्नान, धूलिस्नान शिवाय कधीकधी मुंगी-स्नान करुन पक्षी शरीराची निगा राखतात.

जलस्नान: जवळजवळ सर्व प्रजातीचे पक्षी दररोज पाण्याने आंघोळ करतात. असे करताना संपूर्ण शरीर भिजेल याची ते काळजी घेतात. त्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या हालचाली ते करतात. विविध पक्ष्यांची आंघोळ करण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते असे दिसून येते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सर्वात जास्त प्रकारचे पक्षी उथळ पाण्यात बसुन किंवा उभे राहून पंखांनी अंगावर पाणी उडवुन आंघोळ करतात. उदा. चिमण्या, कावळे, बुलबुल, दयाळ (रॉबिन), साळुंकी (मैना), माशिमार (फॅनटेल फ्लायकॅचर),खाटीक, सुभग, कावळे, शिक्रा सह शिकारी पक्षी इतर बरेच पक्षी उथळ पाण्यात बसुन किंवा उभे राहून पंखांनी अंगावर पाणी उडवुन आंघोळ करतात.

काही पक्षी जसे कोतवाल, वेडाराघु, नाचण, माशिमार (फ्लायकॅचर) मोनार्क, धिवर (किंगफिशर) निळपंख सुद्धा पाण्यात वरुन उडी मारून वरच्यावर डुबकी मारतात असे अनेकदा करतात या उलट स्वर्गीय नर्तक नराची शेपटी खूप लांब असल्याने शेपटीला पाण्याचा स्पर्श न होवु देता पाण्यात वरच्यावर सुर मारून बाहेर पडतात. तर त्याच प्रमाणे भिंगऱ्या पंकोळया फक्त पाण्याला स्पर्श करुनच अंघोळीचे ऐदीसमाधान करुन घेतात

‘चिखलपायटे’ पक्षी (वेडर्स), उदा. चिखल्या, शेकाट्या, तुतारी, टिलवा आणि पाण्यातच पोहणारी वन्य बदके टिबुकली, तसेच पाणकावळे करकोचे पाणकोंबड्या, कमळपक्षी, फटाकडी हे पाण्यात भरपूर वेळ देऊन पाण्याचा खेळताखेळता आंघोळीचा आनंद घेतात. नंतर बाहेर येवून उन्हाचा आनंद घेतात.

सुर्यस्नान (सनबाथ)- थंडीच्या दिवसांत (सनबाथ अथवा बास्किंग) राघू, शिंजिर, हरियाल, खबुतर, धनेश, शिकरा खाटीक वटवट्या व इतर बर्‍याच प्रजातींचे पक्षी सूर्यस्नानाच्या प्रेमात पडले दिसतात. सूर्याची पहिली किरणे पडली की हे पक्षी झाडाच्या उंच फांदीवर व विद्युत तारांवर बसून हे पक्षी दोन्ही पंख उघडून व पाठीवरील पिसे फुलवुन पिसे साफसूफ पण करताना दिसतात सूर्यकिरणांशी काटकोन करून बसून राहतात. जेणेकरून सूर्याची कवळे किरणे पिसांमधून त्वचेपर्यंत पोचतील असे बसून सूर्यकिरणांमुळे शरीराचे तापमान नियंत्रित करत जेणे करुन पिसांचे निर्जंतुकीकरण होते त्याच थंडीत ऊब मिळवून तरतरी येते.

धूलिस्नान- वेडाराघू,धनेश, हुदहुद, चिमण्या, लावा, तित्तर, सारखे इ. पक्ष्यांना धूलिस्नान फार प्रिय आहे. त्यांच्या शरीरातील तैल ग्रंथीमधून निघणारे स्त्रावाच्या चिकटपणाने उडताना बाधा निर्माण होऊ नये यासाठी पिसांमधील तेल वेळोवेळी काढून टाकणे गरजेचे असते. त्याकरिता पक्षी जमिनीवर धूळ (बारीक माती) असेल अशा ठिकाणी धूलिस्नान घ्यायला जमतात. एकामागून एक मातीत लोळून संपूर्ण पिसारा धुळीत घुसळवून घेतात. त्यामुळे पिसांना लागलेले तेल धूळ शोषून घेते व पिसे कोरडी होते. धुलस्नानाने पक्ष्यांना अनेक प्रकारच्या रोग जंतूंपासून मुक्तता मिळवण्यासाठी धूलिस्नानाचा उपयोग होतो. जास्त करुन संध्याकाळी पक्षी धुलस्नान करताना दिसतात.

स्नान घेतल्या नंतर सुरक्षित ठिकाणी बसून स्वतःच्या पिसांची साफसुफ करुन पिसांची घडीसुद्धा नीटनेटकी करत स्वतःच्या शरीराची योग्य ती काळजी घेतात. तसेच एकमेकांची पिसे साफ करून देण्यात मदत करतात. त्यामुळे मैत्री-प्रेमभावना-एकी सुद्धा टिकून राहते.

पक्षांचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी झाडे, पाणी शिवाय मातीही तितकीच जरुरी आहे आणि हे टिकून ठेवणे आपली नैतिक जबाबदारी आहे.

-देवेंद्र तेलकर, अकोला.

लेखकःवन्यजीव अभ्यासक आहेत.

Tags: Akolaoccasion of Bird Week
Previous Post

बोरगाव मंजू येथे कायदेविषयक जनजागृती महाशिबीर: मानवता हाच कायद्याचा आधार-न्या. सुवर्णा केवले

Next Post

Himachal pradesh poll :हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधी काँग्रेसला मोठा धक्का, २६ नेत्यांचा राजीनामा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Himachal pradesh poll

Himachal pradesh poll :हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधी काँग्रेसला मोठा धक्का, २६ नेत्यांचा राजीनामा

Akola

‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ कार्यक्रमात 36 शाळांचा समावेश; विद्यार्थ्यांना देणार प्रशिक्षण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.