• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Stock Market | फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीचे शेअर बाजारात पडसाद, सेन्सेक्स 151 अंकांनी घसरला

Our Media by Our Media
November 3, 2022
in Featured, अर्थकारण, आंतराष्ट्रीय, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
83 1
0
Stock market updates
21
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

Stock Market : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने चौथ्यांदा केलेली व्याजदर वाढ आणि कमकुवत जागतिक संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून आली होती. पण त्यानंतर शेअर बाजार सावरला. सकाळी साडेदहाच्या सुमारात या घसरणीला ब्रेक लागला. यामुळे सेन्सेक्स ६०,८०० वरुन ६१ हजारांच्या दिशेने झुकला आहे. तर निफ्टी १८ हजारांवर व्यवहार करत आहे.

प्री ओपन सत्रात सेन्सेक्स ३५० अंकांनी घसरला होता. तर निफ्टी १८ हजारांच्या खाली आला होता. त्यानंतर सत्र सुरु होताच सेन्सेक्स ६०,८०० वर होता. दरम्यान, बुधवारच्या ८२.७८ च्या तुलनेत गुरुवारी रुपया प्रति डॉलर ८२.८८ वर खुला झाला.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर रात्रभर घसरण झाली. याचा मागोवा घेत आशियाई समभागही घसरले. जपानचा निक्केई निर्देशांक ०.०५ टक्क्यांनी तर दक्षिण कोरियाचा KOSPI ०.५५ टक्क्यांनी घसरला. शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.१२ टक्क्यांनी आणि हँग सेंग निर्देशांक २.३७ टक्क्यांनी घसरला.

अमेरिकेची प्रमुख बँक फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) बुधवारी वाढती महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात आणखी ७५ बेसिक पॉइंट्सची वाढ केली. फेडरल रिझर्व्हने याआधी २१ सप्टेंबर रोजी व्याजदरात ७५ बेसिक पॉइंटची वाढ केली. आता चौथ्यांदा व्याजदरवाढ केली आहे. अमेरिका गेल्या काही वर्षापासून वाढत्या महागाईचा सामना करत आहे. सप्टेंबरसाठी महागाई दर ८.२ टक्क्यांवर होता. जो फेड रिझर्व्हने निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या चारपट जास्त आहे. सप्टेंबरमध्ये फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले होते की महागाई दर २ टक्क्यांवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Tags: stock market
Previous Post

शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण दौरा; 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

Next Post

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला अंतर्गत आगिखेड येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
आगिखेड

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला अंतर्गत आगिखेड येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना; ‘गोल्डन’ व ‘आभा’ ई-कार्ड काढण्याकरीता विशेष मोहिम मोहिम यशस्वी करण्यासाठी नियोजन करा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.