तेल्हारा- कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य स्पर्धेचे तालुकास्तरीय आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा येथे करण्यात आले आहे.
राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करताना विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा व त्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे या दृष्टीने संस्थांमध्ये दिनांक 1/11/2022 ते 15/11/2022 या कालावधीत सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.या स्पर्धेत आय टी आय मधून प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थ्यां व माजी प्रशिक्षणार्थ्यी सहभाग घेऊ शकतात यास्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://forms.gle/iP1HaoR1goKgfX1NA या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन माहिती भरणे आवश्यक आहे .या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी शेती व्यवसाय क्षेत्र, स्वयंरोजगार क्षेत्र, महिला रोजगार क्षेत्र ,आधुनिक तंत्रज्ञान आधारीत अभ्यासक्रम, व इतर उपयुक्त अभ्यासक्रम याबाबत अभ्यासक्रम सुचवायचे आहेत तसेच सुचवीत असलेल्या कौशल्य अभ्यासक्रम बाबत माहिती सादर करावयाची आहे.प्रत्येक तालुक्यातील 3 निवडक स्पर्धक जिल्हास्तरावर पाठवण्यात येणार असून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक ५००० रू ,द्वितीय ३०००, तृतीय २००० रु.असे रोख बक्षिसे व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार असून जास्तीत जास्त आजी माजी प्रशिक्षणार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शासकीय औ.प्र. संस्था तेल्हारा चे प्राचार्य एस आर ठोकरे यांनी केले आहे तसेच अधिक माहिती करिता इच्छुक स्पर्धानी आय टी आय तेल्हारा येथे भेट द्यावी.
(प्रशिक्षणार्थ्यांच्या सहभागातून नावीन्य पूर्ण व आधुनिक अभ्यासक्रम सुचवण्याची ही संधी कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र शासन द्वारा या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी सहभागी व्हावे – एस आर ठोकरे प्राचार्य औ.प्र .संस्था तेल्हारा)