अकोला, दि.14 :- अकोला जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षण सोडत आज जाहिर झाले. ते याप्रमाणे : पंचायत समिती मुर्तीजापूर अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता, तेल्हारा अनुसूचित जाती महिला, अकोला अनुसूचित जमाती महिला, पातूर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, बाळापूर सर्वसाधारण, तर बार्शीटाकळी व अकोट सर्वसाधारण महिलाकरीता आरक्षण निश्चित करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.
पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे पार पडली. यावेळी पंचायत समिती सदस्य, राजकिय पक्षाचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.