मुंबई : दिवाळीनिमित्त रेशकार्डधारकांना वस्तूंचे दिवाळी पॅकेज देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. यामध्ये रवा, चणाडाळ, साखर व तेल केवळ शंभर रुपयांत देण्यात येणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाने आणखी एक निर्णय घेतला आहे. रेशकार्डधारकांना फक्त १०० रूपयांत दिवाळी वस्तूंचे पॅकेज देण्यात येणार आहे. यामध्ये रवा, चणाडाळ, साखर व तेलाचे प्रत्येकी एक किलो पॅकेज असणार आहे. याबरोबरच आजच्या बैठकीत आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्याचाही निर्णय घेण्यात आला. तसेच पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार येणार आहे. नागपूर मेट्रो रेलच्या सुधारित खर्चास मान्यता मिळाल्याने प्रकल्पास गती मिळणार आहे.