आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु होत आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5 जी इंटरनेट सेवा लाँच करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर फाईव्ह-जी सेवा लाँच करणार आहेत. भारतासाठी हा एक विशेष क्षण असेल आणि देश तंत्रज्ञानाच्या नव्या युगात प्रवेश करेल.
सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये ही सेवा मिळणार आहे. या सेवेने देश आता सुपरफास्ट होणार आहे. भारतावर 5G चा एकूण आर्थिक प्रभाव 2035 पर्यंत 450 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत असण्याचा अंदाज आहे. 4G च्या तुलनेत, 5G नेटवर्क अनेक पटींनी जलद गती देते.
सुरवतीच्या टप्प्यात 13 शहरांमध्ये पहिली 5G सेवा सुरू करण्यात येत आहे. ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, कोलकाता, जामनगर, लखनऊ, पुणे या शहरांचा समावेश आहे. दोन वर्षांनंतर 5G सेवेचा देशभरात झपाट्याने विस्तार केला जाईल.
रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या स्पर्धेत आहेत. आता कोणती कंपनी 5G इंटरनेटची सुरुवात करतेय, हे पाहावं लागेल. 5G इंटरनेट सेवा सुरु होत आहे याच पार्श्वभूमीवर अनेक मोबाईल कंपन्यांनी आधापासून 5जी मोबाईलवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. सध्या बाजारात अनेक 5G मोबाईल उपलब्ध आहेत. तर काही कंपन्या सर्वात स्वस्त 5G मोबाईल देत आहेत. रिलायन्स जियो कंपनीने नुकताच जिओ 5G फोन लाँच केले आहेत.