• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचा उपक्रम: ‘लम्पि’ उपचारांबाबत तज्ज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन

Our Media by Our Media
September 19, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
79 0
0
ऑनलाईन मार्गदर्शन
12
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१९:- राज्यात सध्या गोवंशात फैलावत असलेल्या ‘लम्पि’ या रोगाच्या साथीच्या पार्श्वभुमीवर पशुवैद्यकांना लम्पि या रोग व उपचाराबद्दल असलेल्या शंका व भेडसावणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या वतीने शनिवारी (दि.१७) आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी माफसूचे विस्तार शिक्षण संचालक प्रा.डॉ. अनिल भिकाने यांनी राज्यभरातील २१६ पशुवैद्यकांना मार्गदर्शन करुन त्यांचे शंकानिरसन केले.

याप्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे, प्रादेशिक सह आयुक्त अमरावती डॉ. मोहन गोहोत्रे,सहआयुक्त पुणे डॉ.गौरीशंकर हुलसुरे,उपआयुक्त अकोला डॉ. जगदीश बुकतरे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दळवी तसेच पशुसंवर्धन विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, येवतमाळ, नागपूर, जळगाव, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील उपआयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आपल्या मार्गदर्शनात डॉ. भिकाने म्हणाले की, रोगाची तीव्रता अधिक असून गुंतागुंतीची व धोकादायक लक्षणे दिसून येत आहेत. सर्वसामान्य लक्षणाबरोबर सतत ताप असणे, छातीवर पोळीवर व पायावर सूज येवून जनावरे लंगडणे,बसावयास त्रास होणे आणि फुफ्फुसदाह आजाराची लक्षणे दिसून येत आहेत.त्याच बरोबर शरीरात श्वासनलिका फुफुसे यकृत यात गाठी येत आहेत. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाच्या नियोजनपूर्वक व सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे मृत्युदर २ टक्के पेक्षा कमी आहे. बऱ्याचवेळा लम्पि त्वचा रोगाबरोबर थायलोरिओसिस, बॅबेसिओसिस, अनाप्लाझमोसिस, न्यूमोनिया, कावीळ, गर्भाशयदाह इ. रोगामुळे (Co-Morbidity) जनावरे दगावत आहेत. अशा रोगबाधित पशूंचे रक्त, रक्तजल नमुने, प्रयोग शाळेत पाठवून तपासणी करून पुढील उपचार करावे,असे आवाहन डॉ भिकाने यांनी केले.

त्यांनी सांगितले की,कीटकवर्गीय माशा, गोचीड, मच्छर यांच्या माध्यमातून विषाणूंचे वहन होत असल्याने पशुपालकांनी योग्यरीतीने जनावरांची आणि गोठ्याची स्वच्छता ठेवणे, गोचिड गोमाशांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. प्रादुर्भावग्रस्त भागात ४ महिन्यांपेक्षा अधिक वयाच्या निरोगी जनावरात (गाय वर्ग) प्रतिबंधात्मक लसीकरण म्हणून शेळ्यातील देवीची लस उपयुक्त आहे. माणसात हा आजार होत नसल्याने नागरिकांनी घाबरून जावू नये. शास्त्रीयदृष्ट्या दूध उकळून घेणे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे,असे त्यांनी सांगितले. या ऑनलाईन व्याख्यानाचा महाराष्ट्रभरातून २१६ हुन अधिक पशुवैद्यकीय डॉक्टरांनी लाभ घेतला. ऑनलाईन व्याख्यानाच्या आयोजनासाठी समन्वयक प्रा. डॉ. एस. पी. वाघमारे, पशुरुग्णालय अधीक्षक तसेच सहसमन्वयक म्हणून डॉ. किशोर पजई व डॉ. भुपेश कामडी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

Demat Account: ‘हे’ काम ३० सप्टेंबरपर्यंत करा, अन्यथा तुमचे डिमॅट खाते होईल बंद

Next Post

आयटीआय अकोला (मुलींची)येथे ‘कौशल्य दीक्षांत’ समारंभ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
आयटीआय अकोला (मुलींची)येथे ‘कौशल्य दीक्षांत’ समारंभ

आयटीआय अकोला (मुलींची)येथे 'कौशल्य दीक्षांत' समारंभ

लम्पि त्वचारोगः २ लाख ८८ हजार लस मात्रा प्राप्त; लसीकरणाला गती द्यावी- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लम्पि त्वचारोगः २ लाख ८८ हजार लस मात्रा प्राप्त; लसीकरणाला गती द्यावी- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.