• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज गतिमान करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला नवे आदेश

Our Media by Our Media
September 12, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राजकारण, संपादकीय
Reading Time: 1 min read
88 1
0
एकनाथ शिंदे
14
SHARES
636
VIEWS
FBWhatsappTelegram

ग्रामीण भागीतील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन अनुभवता यावे, म्हणून क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज अधिक गतिमान करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला (Ministry of Maharashtra) दिले आहेत.

सर्वसामान्य जनतेला आपल्या अनेक कामासाठी मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. जनतेची ही समस्या लक्षात घेऊनच सध्याच्या सरकारने राज्याच्या विभागीय आयुक्तालयातच मुख्यमंत्री सचिवालयाचे कार्यालय करण्यात आल्याचे, मुख्यमंत्री कार्यालयाने (Ministry of Maharashtra) आपल्या ट्विटरवरून सांगितले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सरकारच्या या निर्णयानुसार, राज्यातील कोकण,अमरावती,पुणे,नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालयाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू (Ministry of Maharashtra) करण्यात आले असून नागरिकांनी आपल्या तक्रारी, निवेदने,अर्ज या विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर करावेत; असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केले आहे

सुशासन नियमावली संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ८ सप्टेंबरला घेतलेल्या बैठकीत विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाच्या कामकाजाविषयी चर्चा झाली. नागरिकांचे विविध प्रश्न आणि शासनस्तरावरील कामे तालुका, जिल्हा पातळीवरच निकाली निघावेत यासाठी विभागीय मुख्यमंत्री सचिवालय अधिक सक्षम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिल्या. नागरिकांची शासनस्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, आदी मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात स्विकारुन त्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधीत क्षेत्रीयस्तरावर कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पार्दशकता, गतिमानता आणतानाच सर्वसामान्य जनतेला कमी त्रास व्हावा या हेतूने कोकण, अमरावती, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालयाचे क्षेत्रीय कार्यालय (सीएमओ) यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयांमधील महसुल उपायुक्त यांना विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी घोषित करण्यात आले आहे. ते याबाबत संनियंत्रण करीत असून, विभागीय कक्षांमध्ये अर्ज स्विकारणे, पोच पावती देणे, अर्जावर कार्यवाही करणे तसेच प्राप्त अर्ज, त्यावरील कार्यवाही केलेले अर्ज व प्रलंबीत अर्ज इ. बाबतचा मासिक अहवाल मुख्यमंत्री सचिवालयाला पाठवितात. मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयाचे या क्षेत्रियस्तरावरील मुख्यमंत्री कार्यालयावर संनियंत्रण केले जात आहे.

माहिती अधिकाराअन्वये प्राप्त होणाऱ्या माहिती अर्जावर प्रशासकीय विलंब टाळण्याच्या दृष्टीने व तातडीने कार्यवाही होण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांमधील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात जनमाहिती अधिकारी, सहायक जन माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी यांना पदनिर्देशित करण्यात आले आहे.

Previous Post

भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यास त्यांना अन्न देणारे जबाबदार : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Next Post

Laser Show: गणेशोत्सवातील लेझर शो घातक; ‘लेसर शो’मुळे 63 जणांच्या डोळ्यांना इजा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
laser Show

Laser Show: गणेशोत्सवातील लेझर शो घातक; ‘लेसर शो’मुळे 63 जणांच्या डोळ्यांना इजा

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकता व

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकता विभागाच्या कार्यशाळेत उद्योजकांना मार्गदर्शन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.