तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा पोलीस स्टेशनच्या वतीने तेल्हारा शहरातील माहेश्वरी भवन येथे गणपती उत्सवा निमित्ताने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शांतता समितीची बैठकीचे अध्यक्ष अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत , प्रमुख उपस्थितीती उपविभागीय पोलिस अधिकारी रितु खोखर, तेल्हारा ठाणेदार ज्ञानोबा फड, तेल्हारा मुख्याधिकारी राजेश गुरव, महावितरणचे अभियंता गुप्ता यांची उपस्थिती होती अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी शांतता समितीचे बैठकीत मार्गदर्शन केले.
तसेच तेल्हारा ठाणेदार ज्ञानोबा फड साहेब यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपविभागीय अधिकारी रितु खोखर मॅडम सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मोरे, तेल्हारा मुख्याधिकारी राजेश गुरव साहेब, शांतता समितीचे सदस्य डॉ.चौधरी, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तेल्हारा शहरातील शांतता समितीचे सदस्य, गणपती मंडळाचे अध्यक्ष सदस्य, तेल्हारा तालुक्यातील पोलीस पाटील, पत्रकार, विविध पक्षाचे पदाधिकारी प्रतिष्ठीत नागरिक पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन तेल्हारा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गणेश कांयदे साहेब यांनी केले.