अकोला,दि.5 :– माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना माध्यमिक शालांत शिक्षण ते पदव्युत्तर तसेच इतर उच्च शिक्षणाकरीता सैनिक कल्याण विभाग, पूणे यांच्यामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या शिष्यवृतीकरीता दि. 30 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाळवे यांनी केले.
सन 2021-22 या शैक्षणिक सत्राकरीता माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी त्यांच्या पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अकोला येथे विहीत नमुन्यामध्ये अर्ज करावेत. विहीत नमुन्याचे अर्ज या कार्यालयात मिळतील.
अर्हता: एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रीकेची झेरॉक्स प्रत व पुढील शिक्षण घेत असल्याबाबत शैक्षणिक संस्थेचा दाखला, बाराव्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रीकेची झेरॉक्स प्रत व पुढील शिक्षण घेत असल्याबाबत शैक्षणिक संस्थेचा दाखला तसेच पदवीधर उत्तीर्ण गुणपत्रीकाची झेरॉक्स व पुढील शिक्षण घेत असल्याबाबत शैक्षणिक दाखला. शैक्षणिक संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळत नाही किंवा मिळत आहे याबाबतचा दाखला आवश्यक. सर्वच नवीन शिष्यवृत्ती करीता सरासरी कमीत कमी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. ज्या माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांना सन 2021-22 ची शिष्यवृत्ती मिळाली आहे त्यांनी सन 2021-22 या शैक्षणिक सत्रामध्ये पास झाल्याची गुणपत्रीकाची झेरॉक्स सांक्षाकित करून तसेच सन 2022-23 मध्ये पुढील शिक्षण घेत असल्याबाबत शैक्षणिक संस्थेचा दाखला. कार्यालयातील अर्ज भरून त्यासोबत लागणारी कागद पत्राच्या छायांकित प्रत जोडावी.
ज्या पाल्यांनी सीइटी, जेईई किंवा इतर कारणासाठी गैप घेऊन शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. अशा पाल्यांना प्रकरणासोबत गैप सर्टिफिकेट (स्वयंघोषणापत्र) घेऊन शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावे. विद्यावेतन मिळण्याकरीता संबंधीतांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अकोला येथे दि. 30 ऑक्टोबर पूर्वी अर्ज पोहोचतील अशा रितीने पाठवावे. मुदतीनंतर प्राप्त अर्जावर विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी कळविले आहे.