तेल्हारा (प्रतिनिधि)- तेल्हारा शहरात मागील अनेक वर्षपासून गरजु विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्च करून उभारलेली अत्याधुनिक सुसज्ज अभ्यासिका वर्षांपासून धूळ खात पडलेली होती. सुसज्ज अभ्यासिका कार्यान्वित होण्यासाठी युवाशक्ती संघटनेने सदर बाबीचा पाठपुरावा केल असता त्याला ०२ सप्टेंबर रोजी यश आले अकोट विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषद तेल्हाराचे प्रशासक देशपांडे साहेब, नगरपरिषद मुख्याधिकारी गुरव साहेब यावेळी उपस्थित होते.
शासकीय नोकरीसाठी अतोनात स्पर्धा निर्माण झाली असताना गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिकेच्या रूपाने हक्काचे ठिकाण मिळण्याकरीता नगरपालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून अभ्यासिकेची मोठी इमारत उभारली होती. परंतु काही शिल्लक स्वरूपाच्या बाकी असलेल्या असलेल्या कारणामुळे बंद पडलेली होती.एकीकडे होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता जागेची प्रचंड अडचण असतांना, विद्यार्थ्यांकरिता उभारलेली सुसज्ज इमारत क्षुल्लक कारणांमुळे बंद पडलेली असल्याचे पाहून युवाशक्ती संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी पाठपुरावा सुरू झाला.
त्यातून नेमकी कोणत्या कारणासाठी अभ्यासिका आज पावतो अद्यावत झाली नाही याची पडताळणी केली असता विद्युत पुरवठा व अभ्यासिकेत बसण्याकरिता खुर्च्यांचा अभाव असल्याचे दिसून आले त्यावरून युवाशक्ती संघटनेचे संस्थापक भवानीप्रताप यांनी नगरपरिषदेचे प्रशासक तथा अकोट विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. देशपांडे साहेब यांच्याशी संपर्क केला तसेच मुख्याधिकारी श्री गुरव साहेब यांच्यासोबत अभ्यासिका लवकरात लवकर सुरू करण्यात यावी याकरिता प्रयत्न केले त्यासाठी युवाशक्ती संघटनेच्या वतीने अकोला स्थित अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली,त्या बाबत दखल घेत उपविभागीय अधिकारी अकोट व नगरपरिषद मुख्याधिकारी साहेबांनी प्रत्यक्ष पाहणी करून अभ्यासिका आज दि 02/09/ 2022 पासून विद्यार्थ्यांकरीता सुरू करण्यात आली.