अकोला-अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सामान्य रुग्णांना येणाऱ्या समस्यांना घेऊन आमदार रणधीर सावरकर यांनी रुग्णालय प्रशासनासोबत बैठक घेऊन भेडसावत असलेल्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या व लवकरात लवकर या समस्या मार्गी लावून रुग्णासवे देणारा अडथळा दूर करावा असे निर्देश दिले समाजातील शेवटचा घटक व ज्यांच्या मागे कोणी नाही असे सर्वसामान्य नागरिक परिवार रुग्ण सेवा घेण्यासाठी पाच जिल्ह्यापासून जिल्ह्यातून अकोल्यात येतात त्यांचा विश्वास त्यांची सेवा व त्यांना योग्य तो मार्गदर्शन उपचार करून त्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असेही निर्देश आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी देऊ अकोला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर असल्याची ही त्यांनी यावेळी सांगितले.
शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे प्रकार आमदार सावरकर यांच्यावरील पर्यंत पोहोचले असता आज रुग्णालय प्रशासनासोबत बैठक घेऊन भेडसावत असलेल्या सर्व समस्या तसेच 27 ऑगस्टला रात्री एन आय सी यु एका लहान बालकाचा मृत्यू झाल्यानंतर उपस्थित डॉक्टर स्टाफने रुग्णाच्या नातेवाईकांना दिलेली वागणूक याबाबत रुग्णालय प्रशासनाला प्रश्न विचारून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच वार्ड मधली लँडलाईन सिस्टीम कुठलीही कुठलाही रिस्पॉन्स देत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले व लवकरात लवकर ही परिस्थिती सुधार व्हावी असे निर्देश दिले रात्रीच्या वेळेला कुठलीही इमर्जन्सी असल्यास संपर्क केल्यानंतर ज्युनिअर स्टाफ तर्फे योग्य रिस्पॉन्स भेटत नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले दोशींवर योग्य ती कारवाई करून परिस्थिती सुधर व्हावी असेही निर्देश दिले तसेच काही दिवसाआधी रक्ता तपासणी मध्ये गलथान कारभार झाल्याचे आढळले एका रुग्णाला दोन वेळा वेगवेगळे रक्तगट तपासले गेले व वेगळे वेगळे रक्त देण्यात आले. असाही प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंबंधी परिस्थिती सुधारून कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले व लवकरात लवकर हे प्रश्न सुटावे यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि आपल्याला या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचं काम व गरिबांची सेवा करण्याचे काम करण्याची संधी या माध्यमातून मिळाली आहे. या संधीचं सोनं करा अशीही यावेळी आमदार सावरकर म्हणाले.
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार वॉर्ड निहाय कर्मचाऱ्यांची ड्युटी बाबतची लिस्ट प्रशासनाकडे मागितली असता देखील ती आज पर्यंत मिळाली नाही. याबाबत रुग्णालय प्रशासनाला प्रश्न विचारून लवकरात लवकर ती लिस्ट देण्यात यावी याबाबत निर्देश दिले. बऱ्याच पेशंटला डायरेक्ट रेफर करून अथवा विचार देण्याचे प्रकार देखील घडले. असल्याचे निदर्शनास आणून दिले जिल्हा सर्वोच्च रुग्णालयातील स्टाफची वाढलेली अरेरावी बघतात यावर प्रशासनाचे अंकुश असण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले. चे प्रकार भविष्यात होणार नाही याची दखल घेण्यात यावी अशी खबरदारी घ्यावी अन्यथा जनतेचा रोष झाल्यास प्रशासन जबाबदार असा इशारा दिला.
जिल्हा सर्वोच्च रुग्णालयाच्या कार्यप्रणालीत अपेक्षित सुधार होईपर्यंत पण शांत बसणार नाही असे यावेळी त्यांनी अधोरेखित केले, व लवकरात लवकर या समस्या निकाली काढून रुग्णसेवेतील अडथळा दूर करावा अशी मागणी जिल्हा सर्वोच्च रुग्णालय प्रशासनाकडे केली यावेळी डीन डॉक्टर श्रीमती गजभिये तसेच प्रशासन अधिकारी व विविध विभागाचे डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, किशोर मालोकार डॉक्टर अमित कावरे डॉक्टर अभय जैन, अक्षय जोशी मोहन पारधी डॉक्टर शंकरराव वाकोडे, जयंत मसने, वसंत बाछुका, माधव मानकर, डॉक्टर अविनाश पाटील, सागर शेगोकार प्रशांत अवचार एडवोकेट देवाशिष काकड गणेश अंधारे संतोष पांडे निलेश निनोरे संजय जीरापुरे संजय गोडफोडे, अंबादास उमाळे, राजेश बेले, अमोलगोगे, सजयगोडा, अनिल गावंडे राहुल देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.