• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’चा प्रादुर्भाव: पशुपालकांना सजगतेचे आवाहन; प्रशासनाची सज्जता, १९६२ टोल फ्री क्रमांक जारी

Our Media by Our Media
August 27, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
78 1
0
जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’चा प्रादुर्भाव: पशुपालकांना सजगतेचे आवाहन; प्रशासनाची सज्जता, १९६२ टोल फ्री क्रमांक जारी
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अकोला दि.२7:-  जिल्ह्यात १०९ जनावरांमध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान जिल्हा पशुसंवर्धन यंत्रणा सज्ज असून पशुपालकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आजारासंबंधी १९६२ हा टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आला असून पशुपालकांनी त्यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

या संदर्भात पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात मौजे निपाना ता. अकोला, तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यातील जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १०९ जनावरांना या आजाराची लागण झाली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यांचे त्वचेचे खरड व रक्त नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

दरम्यान निपाणा ता. अकोला येथील एका जनावरामध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’ या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे अहवाल तपासणी नंतर (दि.२४ रोजी) स्पष्ट झाले आहे. या रोगाचा प्रसार अन्य जनावरांमध्ये जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेवून संक्रमण व सांसंर्गिक रोप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार प्राप्त अधिकारानुसार मौजे निपाना या संसर्गकेंद्रापासून १० किलोमिटर बाधित क्षेत्र घोषित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी (दि.२५ रोजी) निर्गमित केले आहे. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करुन १० किलोमीटर परिघातील परिसरात जनावरांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करणास प्रतिबंध लावण्यात आला. तसेच जिल्हा पशुसवंर्धन विभागाने प्रादुर्भाव भागातील पाच किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण तात्काळ करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या क्षेत्र भेटी

दरम्यान जिल्ह्यातील पशु वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात क्षेत्रभेटी देत आहेत व जनावरांची पाहणी तपासणी करुन पशुपालकांमध्ये जनजागृती करीत आहेत. आज जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बुकतरे यांनी शिवापुर ता. अकोट येथे भेट देऊन जनावरांची पाहणी व तपासणी केली. दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात बाधीत जनावरे आढळलेल्या ठिकाणापासून पाच किमी परिघाच्या क्षेत्रात गोट पॉक्स लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

लम्पि स्किन डिसीज लक्षणेः- लम्पि स्किन डिसीज हा आजार बाह्य किटकाद्वारे पसरतो. संसर्ग झाल्यास जनावरांना मध्यम स्वरुपाचा ताप २ ते ३ दिवस असतो. काही वेळा १०५ ते १०६ फॅ. इतकाही ताप असू शकतो. ताप येऊन गेल्यानंतर शरीरावर २ ते ५ से.मी. आकाराच्या गाठी येतात. तोंडात, घशात व श्वसन नलिकेत पुरळ येतात. तोंडातील पुरळामुळे जनावराची लाळ गळत राहते. जनावरात अशक्तपणा, भूक कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसून आल्यास पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा व तात्काळ जनावरास उपचार द्यावे.

पशुपालकांनी घाबरुन जाऊ नये

या आजाराने जनावरे दगावण्याचे प्रमाण हे १ ते ५ टक्के इतके आहे, त्यामुळे पशुपालकांनी घाबरुन जाऊ नये. हा आजार बाह्य किटकांद्वारे पसरत असल्याने गोठ्यांमध्ये व बाधीत जनावरावर योग्य त्या प्रमाणात औषध फवारणी करावी. बाधीत जनावरांला अन्य जनावरांपासून वेगळे ठेवावे. बाधीत जनावरांच्या गोठ्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड २ टक्के या औषधाची फवारणी करावी. पशुपालकांनी अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

Previous Post

गणेश मुर्तीच्या उंचीवर निर्बंध नाहीत

Next Post

वाडेगाव येथे तंटामुक्त अध्यक्ष व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा नागरिक सत्कार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
वाडेगाव येथे तंटामुक्त अध्यक्ष व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा नागरिक सत्कार

वाडेगाव येथे तंटामुक्त अध्यक्ष व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा नागरिक सत्कार

वाडेगाव महिला ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी खैरूनीसा शेख चांद

वाडेगाव महिला ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी खैरूनीसा शेख चांद

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.