तेल्हारा : तेल्हारा तालुक्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीन पिकांवर सुरूवातीपासून एका एका संकटांची मालिका सुरूच आहे. पेरणी झाल्यानंतर काही दिवसांनी वाणी, खुरपळी ने नुकसान झाले त्याचा बंदोबस्त करत नाही तर सततचे पाणी सुरू झाले त्यामुळे आंतरमशागत खोळंबली किड व रोगांचे प्रमाण वाढले आता पिक जोमात असतांनाच पुन्हा शेंगा कुरतडणारी अळीने शेंगांचे कुरतडणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
तेल्हारा तालुक्यातील या वर्षी सुरुवातीला जुन च्या शेवटी जुलै ला पहिल्या आठवड्यात पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. पिक वाढ होत नाही तर शेतात वाणी व खुरपळी ने मोठे नुकसान करून बऱ्याच शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली त्यानंतर पिक वाढीसाठी पाऊस आवश्यक असताना सततच्या पावसामुळे शेतातील आंतरमशागत खोळंबली व तणाचे प्रमाण वाढून किड व रोगांचे प्रमाण सुद्धा वाढले. सध्या तालुक्यात सोयाबीन पिकांवर अज्ञात अळीचा प्रकोप वाढला आहे. हि अळी परिपक्व होत असलेल्या शेंगा कुरंतडण खात असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.पिकांवर मोठ्या प्रमाणात अळी आल्याने सोयाबीन पिकाचे शेंगा फस्त करित आहे. शेतकऱ्यांनी दोन वेळा किटक नाशक फवारणी करुनही अळीचे प्रमाण कमी होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी केली जात आहे.
या वर्षी सोयाबीन पिक पेरणी केली मात्र पेरणी नंतर सुरूवातीला पाऊस नसल्याने पुन्हा दुबार पेरणी करावी लागली. आता सोयाबीन पिकांवर मोठ्या प्रमाणात अळी आल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सोयाबीन वर तिन फवारणी करुनही अळीचे प्रमाण कमी होत नाही. कृषी विभागाने मार्गदर्शन करून मोफत किटकनाशक औषधे पुरवावे.
शेतकरी वैशालीताई खारोडे.