बामसेफ या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन दिनांक 27 व 28 ऑगष्ट 2022 ला ला. ना. विद्यालयांचे कै. भैय्यासाहेब गंधे सभागृह, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर अधिवेशनाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक व समाजचिंतक डॉ. प्रदीप आगलावे करणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे व डी. के. खापर्डे मेमोरियल स्टचे चेअरमन बी. डी. बोरकर मार्गदर्शन करतील. उद्घाटन सत्राची अध्यक्षता बामसेफच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. दीपा श्रावस्ती करणार आहेत.
पहिल्या दिवशी ‘जाती आधारित जनगणनाबाबतीत लोकांच्या इच्छेचे दमणः लोक उद्रेकाला आमंत्रण’ या विषयावर सत्यशोधक ओबीसी संघाचे नेते उल्हास राठोड, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अकिफ डफेदार व उच्च न्यायालय मुंबईचे विधीज्ञ ॲड.हाके-पाटील मार्गदर्शन करतील. सदर सत्राची अध्यक्षता बामसेफ राज्य संघटन सचिव एम. डी. चंदनशिवे करणार आहेत. दुपारी प्रतिनिधी सत्रामध्ये ‘बीएस4 अभियान संविधानवादाचे व्यावहारिक पैलू आणि क्रियान्वय’ या विषयावर राज्यातील विविध जिल्हयातून आलेले प्रतिनिधी समुह चर्चेत सहभागी होवून आपले मत व्यक्त करतील. दुसऱ्या दिवशी समुह नेते आपल्या गटात झालेल्या चर्चेचे सारांश रूपाने सादरीकरण करतील. या विषयाची अध्यक्षता बामसेफचे राष्ट्रीय संघटन सचिव संजय मोहिते करतील.
दुसऱ्या दिवशी प्रबोधन सत्र दोन मध्ये ‘ धर्मांधारित देशाचा आग्रह- एक राष्ट्र घातकी पाऊल’ या विषयावर बामसेफ रिसर्च विंगच्या सदस्या डॉ. सरोज डांगे, संविधान अभ्यासक प्रा. गणपत धुमाळे, मानव मुक्ती मिशनचे नेते तथा परिवर्तनवादी किर्तनकार नितीन सावंत मार्गदर्शन करतील. या सत्राची अध्यक्षता बामसेफ केंद्रींय कार्यकारिणी सदस्य डॉ. विनोद पवार करणार आहेत. ‘खाजगीकरण आणि कंत्राटी पद्धतीच्या दुष्परिणामाला नष्ट करण्याची रणनीतीः एक राष्ट्रव्यापी चर्चा’ या प्रबोधन सत्र तीनच्या विषयावर भूमीपुत्र बचाव आंदोलनाचे नेते शशी सोनवणे, कास्ट ट्राईब महासंघाचे अरूण गाडे, जुनी पेंशन हक्क संघटनेचे शहाजी गोरवे मार्गदर्शन करतील. सदर सत्राची अध्यक्षता व बामसेफचे राष्ट्रीय महासचिव डॉ. संजय इंगोले करणार आहेत.