• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण व व्यवस्थापनः जिल्हास्तरीय आढावा बैठक – एकात्मिक नियंत्रणावर भर द्यावा-शास्त्रज्ञांचा सल्ला

Our Media by Our Media
August 25, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, शेती
Reading Time: 1 min read
78 0
0
गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण व व्यवस्थापनः जिल्हास्तरीय आढावा बैठक – एकात्मिक नियंत्रणावर भर द्यावा-शास्त्रज्ञांचा सल्ला
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. २5:- कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव नियंत्रण व व्यवस्थापनासाठी राबवावयाच्या उपाययोजना एकात्मिक पद्धतीने राबवाव्या, असा सल्ला किटक शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील कृषी यंत्रणेस तसेच शेतकऱ्यांना दिला आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या एकात्मिक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील कपाशीवर प्रक्रिया करणाऱ्या जिनिंग व प्रेसिंग मालकांनीही पुढाकार घेऊन योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रण व व्यवस्थापनाकरीता जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा, जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी डॉ.मुरलीधर इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.कांताप्पा खोत, तालुका कृषी अधिकारी एस. एस. शिंदे, एस. डी. जाधव, विलास वाशीमकर, मंडळ कृषी अधिकारी पी.ए. राऊत, जी.ए. राऊत, ए.एस.मेश्राम, सी.पी. नावकार, कृषी सेवक, जिनिंग व प्रेसिंग मिल मालक व कर्मचारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाकरीता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे किटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी एकात्मिक व्यवस्थापन उपाययोजनांची माहिती दिली. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा साठवलेल्या कापसातून होण्याची शक्यता असते. जिनिंग प्रेसिंग मध्ये साठवलेल्या कापसात जर बोंड अळीचे अंडे शिल्लक राहून गेले असतील तर पोषक वातावरण मिळताच त्यांचे जीवनचक्र गतिमान होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जिनिंग व प्रेसिंग मिल, कापूस व्यापारी यांनी आपापल्या परिसरात एकात्मिक व्यवस्थापन करुन योगदान द्यावे. आपापल्या जिनिंग प्रेसिंग मध्ये प्रकाश सापळे, कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी आपल्या कपाशीच्या शेतात प्रकाश सापळे व कामगंध सापळे लावावे. त्यात अडकलेले पतंग नष्ट करावे. सरकीतील अळ्या व कोष नष्ट करणे, फेरोमेन सापळ्यातील ल्युर्स वेळचे वेळी बदलणे. तसेच जिनिंग प्रेसिंग मध्ये कापसापासून निर्माण झालेला कचरा नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवणे अशा उपाययोजना राबवाव्या, असा सल्ला डॉ. उंदिरवाडे यांनी दिला. त्यांनी सांगितले की, गुलाबी बोंडअळी नियंत्रणाकरीता शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करुन किड नियंत्रणाबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. उंदिरवाडे यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी विलास वाशीमकर यांनी केले.

Previous Post

अकोला – पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून धावणाऱ्या तरुणीचा धावतांना मृत्यू

Next Post

विशेष लेख :-देशी वळू संगोपनाच्या संकल्पाने साजरा करू बैलपोळा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Pola

विशेष लेख :-देशी वळू संगोपनाच्या संकल्पाने साजरा करू बैलपोळा

प्रशासन आणि सार्वजनिक मंडळांची बैठक गणेशोत्सवः सद्भाव, सुरक्षा आणि सामंजस्याचा

प्रशासन आणि सार्वजनिक मंडळांची बैठक गणेशोत्सवः सद्भाव, सुरक्षा आणि सामंजस्याचा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.