अकोट :- अकोट तालुक्यातील वरुर जऊळका येथील योग योगेश्वर संस्थान येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समर्थ सद्गुरु गजानन महाराज यांच्या समाधी संजीवन (ऋषिपंचमी) सोहळ्यानिमित्य दि २५-८-२०२२ ते १-९-२०२२ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी पाच ते सहा काकड आरती, सकाळी दहा ते बारा व दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेचे पारायण व्यासपीठ नेतृत्व ह भ प ज्ञानेश्वर महाराज नावकार यांच्या कडे राहील.
सायंकाळी सहा ते सात हरिपाठानंतर रात्री आठ ते दाहा वाजेपर्यंत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार महाराज मंडळींचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये ह भ प कार्तिक महाराज इंगोले,ह भ प गजानन महाराज दहीकर,ह भ प सोपान महाराज काळपांडे,ह भ प शालिकराम महाराज सुरडकर,ह भ प ज्ञानेश्वर महाराज महल्ले,ह भ प रमेश महाराज दुधे,ह भ प राजेंद्र महाराज वक्ते व काल्याचे किर्तन योगेश्वर संस्थानाध्यक्ष ह भ प गणेश महाराज शेटे यांचे राहील काल्याच्या कीर्तनामध्ये ह भ प श्री मधुकर महाराज साबळे संत सोनाजी महाराज पायदल दिंडी चालक यांना विश्व वारकरी सेनेच्या वतीने निष्ठावंत वारकरी पुरस्कार देण्यात येईल व महाप्रसादानंतर वरुर जऊळका या संत नगरीतून श्रींच्या मुखवट्या व पादुकासह भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे व रात्री ह भ प संतोष महाराज भालेराव यांच्या भारुडाचा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमांमध्ये पंचक्रोशीतील गायक, वादक व गजानन महाराजांची भक्तगण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती योगेश्वर संस्थांच्या वतीने देण्यात आली.