अकोला दि.22 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.21) रोजी जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पुर्व) परिक्षा 12 उपकेंद्रावर दोन सत्रात सुरळीत पार पडली. परीक्षेकरीता पहिल्या सत्रात 3 हजार 457 परिक्षार्थीपैकी 2 हजार 548 परिक्षार्थी तर दुसऱ्या सत्रात 3 हजार 457 परिक्षार्थीपैकी 2 हजार 529 परिक्षार्थी परिक्षेस उपस्थित होते. तर 1 हजार 837 परिक्षार्थी अनुपस्थित होते, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी दिली.
एमपीएससी परीक्षा यशस्वी करण्याकरीता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहिले. तर तहसिलदार सुनिल पाटील, खरेदी अधिकारी बळवंत अरखराव, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले यांनी परीक्षा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून काम पार केले. परीक्षा केंद्रावर परीक्षा नियंत्रक सदाशिव शेलार यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या.