अकोला- अकोला जिल्ह्यातील ग्राम दोनद बु येथील नदीत एका २२ वर्षीय युवकाची नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. जिल्ह्यातील ग्राम दोनद बु येथिल काटेपुर्ण नदी पात्रात निंबा येथिल एक युवक बुडल्याची माहिती दोनद बु येथील आसरा माता जीव रक्षक दल यांना माहिती होताच दलाच्या युवकांनी नदी पात्रात शोध घेतला, असता सदर युवक हा सापडून आला सदर युवक हा निंबा येथील असून रोशन हीरडकर असे सदर युवकाचे नाव आहे.
पुढील तपास ठाणेदार अजय वाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली रोशन राठोड करीत आहेत.