अकोला, दि. 18: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चे 15 वर्षाआतील मुले संघाचे सामनाचे आयोजन दि. 16 व 17 रोजी पार पडल्या.
अंतिम निकाल या प्रमाणे- प्रथम क्रमांक- श्री साई विद्यालय, लोहारा जि.यवतमाळ, व्दितीय क्रमांक- सहाकर विद्यामंदीर विद्यालय, बुलडाणा तर तृतीय क्रमांक-स्कुल ऑफ स्कॉलर्स,हिंगणा रोड या संघाना मिळाले.
या स्पर्धेचे पंच म्हणून अजय कांबळे, मयुर निंबाळकर, स्वप्निल अंभोरे, मयुर चौधरी, परेश घाटोळ, गौरव दांदळे, आशिष उगवेकर, तौफीक शेख, ऋषिकेश श्रीवास, ओम टाकसाळकर, आशिष अढाऊ, साहिल कंदारकर, धिरज चव्हाण यांनी काम पाहीले. विभागीय स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या सर्व संघास राज्यस्तरीय नेहरु कप स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडू संघास जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरीता स्पर्धा संयोजक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.