अकोट(प्रतिनिधी)- दिनांक ०७.०८.२०१२ रोजी फिर्यादी नामे संजय गणेशप्रसाद खंडेलवाल वय ३८ वर्षे रा. आमगांव ता. आमगांव जि. गोंदीया यांना त्यांचा भाडेकरू आरोपी नामे संदीप शालीकराम बन्सोड वय ३३ वर्षे रा. आमगांव जि. गोंदीया याने अर्ध्या किमतीत सोने घेवुन देतो असे म्हणुन फीर्यादीला दिवठाणा फाटा ता. अकोट जि. अकोला येथे कारने घेवुन आला. आरोपी संदीप बन्सोड याने त्याचे साथीदारांना सदर ठिकाणी बोलावुन फिर्यादी कडुन सोने घेण्याकरीता त्याचे साथीदारांमार्फत २ लाख रूपये घेवुन २५० ग्रॅम सोने देतो अशी बतावणी करून तसेच त्याचे कडील मोबाईल फोन घेवुन काय लफडे करीत आहोत असे त्याचे साथीदारांकडुन पोलीस असल्याची बतावणी केली फीर्यादी जवळील २ लाख रुपये आणि विवो कंपनीचा ७९ मोबाईल फोन किंमत अंदाजे १०,०००/- रू असा एकुण २,१०,०००/- रु घेवुन जावुन फसवणुक केली आहे. अशा रिपोर्ट वरून पो स्टे अकोट ग्रामिण येथे अप नं ३२१/२२ कलम ४२०, १७०, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करून तपसात घेतला.
सदर गुन्हयांचे तपासात फीर्यादी सोबत असलेला त्याचा भाडेकरू संदीप शालीकराम बन्सोड रा. आमगावं याचा सहभाग असल्याने निष्पन्न झाल्याने त्यास दि ४.५.२०२२ रोजी अटक केली अटक आरोपी कडे कौशल्यपूर्वक तपास केला असता सदर गुन्हयांमध्ये १. शुभम रमेश चव्हाण वय २५ वर्षे २.देवानंद विष्णुपंत सरदार वय ३८ वर्षे रा. वाघोली ता. जि. अमरावती व इतर साथीदार असल्याचे निष्पन्न झाले असुन आरोपी शुभम रमेश चव्हाण व देवानंद विष्णुपंत सरदार हया दोन आरोपीतांना दि५.८.२०२२ रोजी अटक केली व गुन्हयांचे तपासात त्यांचेकडुन रोख ९९,०००/- रू एक मोटर सायकल कि ५०,०००/- रू व २ मोबाईल किंमत १२,०००/-रू असा एकुण १,६१,००० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्री जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, अकोला, मा. श्रीमती मोनिका राउत, अपर पोलीस अधीक्षक, अकोला, मा. सहा. पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधीकारी अकोट श्रीमती रीतु खोकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील सपोनि महेश गावंडे व त्यांचे पथक तसेच पोलीस स्टेशन अकोट ग्रामिणचे पोउपनि पंचबुधे, जउळकर प्रो. पोउपनि विष्णु बोडखे, पोलीस अमंलदार योगेश , शैलेश जाधव, रुकेश हासुळे, उमेश दुतोंडे यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा तपास पोउपनि विजय पंचबुधे पो रटे अकोट ग्रामिण हे करीत आहेत.