अकोला दि. ४: असंघटीत कामगारांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासनामार्फत तयार करण्यात आलेल्या श्रम व रोजगार विभागाच्या ई-श्रम पोर्टलवर मत्स्यव्यवसायातील कामगार, विक्रते, मत्स्य कास्तकार व मत्स्य व्यवसायाशी प्रत्यक्ष सहभाग असलेल्या कामगारांनी नोंद करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त वि. श्री. राठोड यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार विभागाच्या https://register.eshram.gov.in/#/user/self या पोर्टलवर आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, बॅंकेचे तपशिल इ. माहितीसह मत्स्यकामगारांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्येही मोफत नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी आवश्यक पात्रता मत्स्यव्यसाय मत्स्यशेती क्षेत्रातील मच्छिमार व मत्स्यमुल्य साखळी (Eisheries vaIue Chain) इ. मध्ये समाविष्ट असलेले मत्स्यकामगार यांची वयोमर्यादा १६ते ५९ वर्ष असावी, कामगार हे EmpIoyees State Insurance
(ESI) EmpIoyees providet Fund Organisation (EPFO) हे सभासद नसावेत. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs ) व शासन सेवेतील कर्मचारी व आयकर भरणारे नसावे.
पोर्टल मध्ये नोंदणी झालेल्या मत्स्यकामगारांना मिळणारे लाभ-
१. या पोर्टलद्वारे असंघटीत मजूर, मच्छिमार, मत्स्यशेती व मत्स्यव्यवसाय अनुषंगाने कामांमध्ये समावेश असलेल्या व्यक्तिंची माहिती आधार नंबरशी जोडून अपलोड करण्यात येते.
२.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत सुरक्षा विमा योजनेतून व्यक्ती मृत झाल्यास दोन लक्ष रुपये व कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास एक लक्ष रूपये देणे शक्य होईल.
३. असंघटीत कामगारांना सामाजीक सुरक्षा फायदे देणे शक्य होईल.
४.या पोर्टलवरील डेटाबेस, अचानक उदभवणाऱ्या व राष्ट्रीय महामारीसारख्या परिस्थितीमध्ये सहाय्यासाठी वापरता येणे शक्य होईल.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय वि. श्री. राठोड, व सहाय्यक मत्स्यव्यसाय विकास अधिकारी स्व. अ. दाभणे, यांच्याशी प्रत्यक्ष कार्यालयात येवून संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.