अकोला,दि. 3 : आरोग्य विज्ञान अभियंत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या एमएचटि-सिईटी सामाईक प्रवेश परिक्षा-2022 चे 5 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत दोन सत्रात अकोला जिल्ह्यातील एकूण चार उपकेन्द्रावर आयोजन केलेले आहे. या परिक्षा केंद्रावर जिल्ह्यातील एकूण 16 हजार 916 परिक्षार्थीचे नियोजन केले आहे, अशी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
एमएचटि-सिईटी सामाईक प्रवेश परिक्षा सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा नियंत्रक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व शासकीय तंत्रनिकेतन मुर्तिजापूरचे एस.आर. पाटिल तर शासकीय तंत्रनिकेतन मुर्तिजापूरचे पि.डी.पाटील हे जिल्हा संपर्क अधिकारी तसेच केंद्र प्रमुख एम.आर.ई.जि.एस ज्यु.इंजिनियर अकोलाचे गुंज राठोड व जिल्हा परिषद उपविभागीय ग्रामिण पाणीपुरवठाचे कनिष्ठ अभियंता जयंतीलाल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यातील एकूण चार उपकेन्द्रावर दोन सत्रामध्ये एमएचटि-सिईटी सामाईक प्रवेश परिक्षा होणार आहे. त्यात कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजी, बाबुळगाव या परिक्षा केंद्रावर पीसीएम ग्रुपचे 3850 तर पीसीबी ग्रुपचे 4208 विद्यार्थी, मानव स्कुल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी व्याळा या परिक्षा केंद्रावर पीसीबी ग्रुपचे 1798 विद्यार्थी, संतोष कुटे एक्सामिनेशन सेंटर अकोला या परिक्षा केंद्रावर पीसीएम ग्रुपचे 233 तर पीसीबी ग्रुपचे 1199 विद्यार्थी व श्री इनफोटेक कापसी या परिक्षा केंद्रावर पीसीएम ग्रुपचे 2691 तर पीसीबी ग्रुपचे 2937 विद्यार्थी असे एकूण 16916 परिक्षार्थी उपस्थित राहणार आहे. परीक्षेकरीता विद्यार्थ्यांनी नियोजीत वेळेत परिक्षा केंद्रावर हजर राहावे. ॲडमिट कार्ड व ओरिजनल ओळखपत्र सोबत ठेवावे. तसेच संबंधित परिक्षा केन्द्रावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे, असे पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.