अकोला,दि.3: उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे मराठी भाषेचे वैभव, प्रचार, संवर्धन व मराठी वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी याकरीता गुरुवार दि. 28 जुलै रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला येथे मराठी भाषेसंबधीत साहीत्यावर डॉ. कैलास वानखडे व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री विजयराव दुतोंडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने श्रोत्याची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातील सरस्वती प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक मोटार वाहन निरीक्षक दिनेश मिठाराम एकडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीकरीता उपप्रादेशिक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.