अकोला,दि.2: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन सोमवार दि.8 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यात 224 पदांची भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. मेळाव्यात रोजगार इच्छुक युवक युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यात 1) उत्कर्ष स्मॉल फायनन्स लि.मध्ये कारंजा, वाशिम, जळगांव, पाचोरा व चाळीसगाव शाखेकरीता कलेक्शन ऑफिसरचे 25 पदे व कॅशीअरचे 25 पदे, 2) रॉयल क्रॉप सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी प्रा.लि.अकोला येथे प्रोडक्शन सुपरवाईझर व स्टोअरकिपर पदाचे प्रत्येकी एक, अकॉऊंटंट, डिसपॅच ग्रिस व सेक्युरिटी गार्ड पदाचे प्रत्येकी दोन, बँक ग्रिस एक्झेकेव्हिव पदाचे चार तर वेल्डर, फिटर व इलेक्ट्रीशियन पदाचे 12 असे एकूण 24 पदे, 3) क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण लि. येथे ट्रेनी केंद्र मॅनेजरचे 50 पदे, 4) बडवे इंजिनियरिंग औरंगाबाद आणि पुणेकरीता प्रशिक्षणार्थीचे 100 पदे असे एकूण 224 पदांच्या भरतीचे नियोजन करण्यात आले आहे.
सहभागासाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन शैक्षणीक पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच इतर जिल्ह्यातील उमेदवारही अर्ज शकतात. ज्या उमदेवारांनी अद्याप सेवायोजन कार्ड नोंदणी केलेली नाही त्यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ नोंदणी करुन आपल्या शैक्षणीक पात्रतेच्या आधारे ऑनलाईन अर्ज करुन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
त्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. जॉबसिकर अर्थात (Fing a job) हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक किंवा आधारक्रमांक आणि पासवर्ड वापरुन लॉगईन करा. आपल्या प्रोफाईल मधील होमपेजवरुन पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा हा पर्याय निवडा नंतर अकोला जिल्हा निवडा. दि.8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मेळाव्यात सहभागासाठी क्लिक करा.I Agree हा पर्याय निवडा. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करुन Apply बटनावर क्लिक करा.
इच्छुक उमेदवारांना दि. 8 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वखर्चाने व शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट साईझ फोटो सह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी 0724-2433849 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.