तेल्हारा- तालुक्यातील अडसूळ येथे सोन्याच्या दुकानात दुकान मालकास मारहाण करून दुकानामधील सोन्याच्या दागिने ने भरलेली बॅग घेऊन आरोपी फिर्यादिस घरी घेवून गेले व त्यानंतर आरोपी यांनी फिर्यादिस सोडून सोन्याची बँग घेऊन काढला सदर घटना अडसूळ येथे 27 जुलै रोजी 4 वाजता घडली यातील दोन्ही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.
सोने विक्री चा व्यवसाय असलेले फिर्यादी जुगलकिशोर रानुलाल वर्मा रा तेल्हारा हे अडसूळ येथे आपल्या दुकानात बसलेले असतांना आरोपी नितीन गजानन अमझरे रा अडसूळ हा हाथात लोखंडी पाईप घेवुन व श्रीकृष्ण सुभाष नांदने रा काकणवाडा ता संग्रामपुर जिल्हा बुलढाणा हा हाथात कोयता घेऊन दुकानात आले.
नितीन अमझरे याने फिर्यादीस तू माझी घेतलेली चार चाकी गाडी परत दे म्हणून शिवीगाळ केली व लोखंडी पाईप ने मारहाण केली व फिर्यादी च्या दुकानांतील विविध दागिनेचे भरलेली बॅग जबरीने हिसकावून घेतली. आरोपी नितीन अमझरे याने फिर्यादी जुगलकिशोर वर्मा याची गलपड पकडून घरी नेले व फिर्यादीच्या खिशातील गाडीची चावी काढून घेतली त्यावर फिर्यादी याने मला सोडून दे तू व माझ्या भाच्याचा व्यवहार झाला. तो तुम्ही बघून घ्या व माझी बॅग मला परत दे अशी विनवणी केली, असता आरोपी यांनी काही ऐकले नसून फिर्यादी स घराबाहेर हकलुन दिले व दोन्ही आरोपीनी सोन्याची 548 ग्रॅम ची वेगवेगळ्या प्रकारची भरलेली बँग बाजार किंमत 25 लाख 75 हजार सहाशे रुपये घेऊन पळून गेले सदर प्रकरणात पोलिसांनी कलम 394,504,34 नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी श्रीकृष्ण सुभाष नांदने यास पहिले अटक केली व न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर एक आरोपी फरार होता ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश कायंदे पुढील तपास करीत असतांना पोलिसांनी उत्तम कामगिरी करीत दुसऱ्या आरोपीला बैतुल येथून अटक केली आहे. यातील नितीन अमझरे हा मामा असून मुख्य आरोपी आहे. तर श्रीकृष्ण नांदने हा भाचा आहे.