• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मतदारयादीतील तपशील आधारशी जोडण्यास 1 ऑगस्टपासून सुरूवात; ऑनलाईनव्दारे करता येणार आधार संलग्न

Our Media by Our Media
July 26, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
100 1
0
nima arora
18
SHARES
719
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.26: निवडणूक मतदारयादीतील मतदारांच्या तपशिलाशी आधारची माहिती संग्रहित करण्याचा कार्यक्रम व्यापक स्वरूपात दि. 1 ऑगस्ट 2022 पासून करण्यात येणार आहे. मतदारांनी आधार क्रमांक सादर करणे ही बाब ऐच्छिक राहणार आहे. त्यामुळे आधार क्रमांक लिंक केले नसल्यास मतदारयादीतून नाव वगळल्या जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.

मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदारयादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीची नावनोंदणी ओळखणे यासाठी मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक लिंक केल्या जाणार आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी दि. 1 ऑगस्ट 2022 पासून व्यापक प्रमाणात करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदारयादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित नमुन्यात आधार क्रमांक घरोघरी जावून वा विशेष शिबीराव्दारे माहिती गोळा करण्यात येणार आहे. मतदारांना त्यांच्या आधार क्रमांक भरण्सासाठी नमुना अर्ज क्र. 6 ब तयार करण्यात आला आहे. अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या cci.gov.in व मुख्य निवडणूक अधिकारी https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. तसेच अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रती देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्याची सुविधा पोर्टल, ॲपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्याच्या दोन पद्धती असतील. स्व-प्रमाणीकरणाच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल, ॲपच्या माध्यमातून मतदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्र. 6 भरुन आधार क्रमांक नोंदवू शकतील. तसेच स्व-प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरुन त्यामध्ये दर्शविलेल्या 11 पर्यायी कागदपत्रांपैकी मनरेगा जॉब कार्ड, बँक, पोस्ट ऑफीस कार्यालयाकडून निर्गमित केलेले फोटोसहीत पासबुक, आरोग्य विमा, स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्‍स, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआय मार्फत वितरीत केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसहित पेंशन कागदपत्रे, केंद्र आणि राज्य शासन कर्मचाऱ्यांचे छायाचित्रासह ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र यापैकी एक दस्ताऐवज सादर करता येईल.

जिल्ह्यामध्ये एकूण 15 लक्ष 50 हजार 704 मतदार असून त्यापैकी पुरूष मतदार 8 लक्ष 1 हजार 587, स्त्री मतदार 7 लक्ष 45 हजार 762, तृतीयपंथी मतदार 34 तर सैनिक मतदार 3 हजार 298 आहेत. त्यांच्या करिता अकोला जिल्ह्यात एकूण 1680 मतदार केंद्र असून प्रति मतदार केंद्र एक मतदार नोंदणी अधिकारी कार्यान्वीत आहे. तरी मतदारांनी मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक संलग्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

Tags: Aadhar cardAkolaNima AroraVoter ID Card
Previous Post

साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे विकास महामंडळ अनुदान योजना व बिज भांडवल योजना; अर्ज मागविले

Next Post

पातूर येथील 132 के व्ही उपकेंद्रात सर्पमित्र कार्यशाळा संपन्न

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पातूर येथील 132 के व्ही उपकेंद्रात सर्पमित्र कार्यशाळा संपन्न

पातूर येथील 132 के व्ही उपकेंद्रात सर्पमित्र कार्यशाळा संपन्न

विशेष लेख : प्रधानमंत्री मातृवंदना योजना देशाचे भविष्यः सुदृढ माता-सुदृढ बालक

विशेष लेख : प्रधानमंत्री मातृवंदना योजना देशाचे भविष्यः सुदृढ माता-सुदृढ बालक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.