तेल्हारा (प्रतिनिधी)- सविस्तर वृत्त असे की ग्राम नेर ता. तेल्हारा येथील शेत सर्वे क्रं.२३०मधे ०.४७आर क्षेत्रफळ असलेले शेत नेर मधील बौध्द समाजासाठी स्मशानभूमी साठी मूळ मालक गोविंदप्रसाद द्वारकादास पाडलीवार यांनी दिली आहे कित्येक वर्षांपासून बौध्द बांधव समाजातील मृतांवर त्या शेतात अंतिम संस्कार करतात परंतु त्याच सामूहिक गटातील शेतकरी विश्वनाथ सपकाळ त्या शेतजमिनीवर अतिक्रमण केले, “चोराच्या उलट्या बोंबा ” या उक्तीप्रमाणे याच व्यक्तीने ग्रामपंचायतला एक विनंती अर्ज सादर केला व माझ्या शेतात यापुढे कोणीही मृत व्यक्तीस पुरवू नये किंवा दहन देऊ नये अशा प्रकारची दवंडी पिटण्यात आली. व ही दवंडी देतांना सरपंच व ग्रामसचिव यांनी देखील कुठलीही शहानिशा न करता ती देणे याबाबत सुज्ञ नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
वास्तवता हा अधिकार महसूल विभागाचा असल्यावर ग्राम पंचायतने अतिसंवेदनशील मुदयाला हात का घातला. हे काही बौध्द जणांच्या लक्षात आले व त्यांनी तहसीलदार साहेब तेल्हारा यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली सोबतच त्या दान दात्याने बौध्द स्मशान भूमिस ती जमीन दान दिली होती त्याचे नाव व जमिनीचे क्षेत्रफळ अद्याप त्या सातबारा वर आढळून येते.
ग्रामपंचायतचे काम गावात शांतता राखण्याचे असते पण येथील सरपंच व सचिव यांनी गावात अशांतता माजेल अशा उपक्रमाणे सर्वाना विचार करण्यास भाग पाडले आहे. पुढे भविष्यात काही वाद झाल्यास यास जवाबदार कोण? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.
तरी संबंधित महसूल यंत्रणांनी यात लक्ष घालून निवेदन कर्त्यांना न्याय मिळवून देऊन पुढील अनर्थ टाळावा हिच माफक अपेक्षा निवेदनकर्त्यांची आहे.