अकोला, दि.21 प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 करीता सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस व ज्वारी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. अंतिम दिनांकापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे.
यासंदर्भात कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार,अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदवयाचा नसेल तर त्यांनी सहभागी न होणे बाबतचे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतीम मुदतीच्या सात दिवस अगोदर संबंधी बँकेस देणे आवश्यक आहे. योजनेत सहभाग नोंदविणेकरीता नजिकचे सीएससी केंद्र अथवा बँकेतून विमा काढता येईल.
अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 अंमलबजावणी करीता खालील कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे.
आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्सुरन्स कं.लि.पुणे, माणिकचंद आयकॉन, 3 रा मजला, प्लॉट नं.246, सी विंग, बंडगार्डन, पुणे-411001, ग्राहक सेवा क्र. 18001037712 ईमेल [email protected]
आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी खालीलप्रमाणे–
नाव | पद | मोबाईल नं. |
प्रभास अर्बाईन | जिल्हा व्यवस्थापक,अकोला | ७३०४५६००२३ |
कमलेश पाटील | जिल्हा प्रतींनिधी,अकोला | ७२०८९७९३९ |
योगेश घाटवट | तालुका प्रतींनिधी, अकोला | ८८८८८७२८५४ |
प्रफुल्ल गव्हाने | तालुका प्रतींनिधी,मूर्तीजपुर | ९०११४०३२२७ |
महेश दांदळे | तालुका प्रतींनिधी, पातूर | ८३९०९१८३५८ |
अमोल टाळे | तालुका प्रतींनिधी,बाळापूर | ९७६६५८३२५६ |
नरेंद्र बहाकार | तालुका प्रतींनिधी, बार्शीटाकळी | ९७६६५५८५६१ |
आशीष भिसे | तालुका प्रतींनिधी, तेल्हारा | ९६६५५६२९५७ |
विकास शिंदे | तालुका प्रतींनिधी,अकोट | ७७०९७३७६०७ |
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता खालीलप्रमाणे आहे.
पिकाचे नाव | विमा संरक्षित रक्कम (रु. प्रति हेक्टर) | शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु) |
खरीप ज्वारी | ३०००० | ६००.०० |
सोयाबीन | ५४००० | १०८०.०० |
मुंग | २२८०० | ४५६.०० |
उडीद | २२८०० | ४५६.०० |
तूर | ३६८०२ | ७३६.०४ |
कापूस | ५१६०० | २५८०.०० |
अधिसूचित पिके, महसूल मंडळ व समाविष्ट तालुक्यांची संख्या | ||
अधिसूचित पिके | तालुका | महसूल मंडळे |
खरीप ज्वारी, सोयाबीन, मुंग, उडीद, तूर, कापूस. | सर्व तालुके | जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळे |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादि बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणामुळे पिकाचे होणारे काढणी पश्च्यात नुकसान या बाबींचा समावेश आहे. जोखमस्तर 70 टक्के असा आहे. तरी पिक विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीकरिता उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.