अकोला- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूकीतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.सुप्रीम कोर्टाने आज बाठिंया आयोगाचा अहवाल मान्य केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे आपण स्वागत करीत असून उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व भाजपा यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे सांगुन बहुजन, गरीब कल्याण व सर्वसामान्यांच्या कल्याणाचा निर्णय व कृतीने कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रात नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या नेतृत्व होणारच असा विश्वास जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले आहे.
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याचा प्रश्न दिर्घकाळ प्रलंबित होता.हा प्रश्न निकाली निघावा म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्याने प्रयत्न केले.श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली.या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतिनिधींना महापालिका,नगरपालिका,पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगरपंचायतीच्या प्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळेल.राज्यात ३४ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या, २४१ नगरपालिका, २७ महापालिका, १२८ नगरपंचायती आणि २७८३१ ग्रामपंचायती आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण लागू झाल्यास महापालिकांमध्ये बाठिंया आयोगानुसार २६ टक्के आरक्षणाप्रमाणे ७ महापालिकांचे महापौर पद ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतिनिधीला मिळेल. राज्यातील २४१ नगरपालिकांपैकी २७ टक्के ओबीसी आरक्षणाप्रमाणे ६६ नगरपालिकांचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होईल. १२८ नगरपंचायतीपैकी ३७ ठिकाणी ओबीसी प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव असेल. नगरपंचायतीमध्ये देखील ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळेल. असेही यावेळी आमदार सावरकर म्हणाले भारतीय जनता पार्टी तर्फे तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह जयप्रकाश नारायण चौक इथे जल्लोष व आतिषबाजी मिठाई वाचून ओबीसींना आरक्षण मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत भारतीय जनता पार्टीने ओबीसी बांधवांना दिलेला शब्द पाळला असल्याची प्रतिक्रिया भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे. श्री विजयभाऊ अग्रवाल, सौ. अर्चनाताई मसने, श्री. किशोर मांगटे, श्री जयंतराव मसने, अश्विनी ताई हातवळणे, संजय गोडा, उकंडराव सोनोने, ऍड देवाशिष काकड, सागर शेगोकार, हरीश काळे, सौ सुनीता ताई अग्रवाल,सौ. गीतांजलीताई शेगोकार, सौ. पल्लवी मोरे, अनुराधा नावकर,रश्मी अवचार, संदीप गावंडे, मिलिंद राऊत, अनिल नावकर, संदीप शेगोकार, प्रशांत अवचार, सुभाष खंडारे, राहुल देशमुख, सारिका ताई जयस्वाल, आरती घोगलिया, प्रकाश घोगलिया, अजय शर्मा, सिद्धार्थ शर्मा संजय गोडा शंकरराव वाकोडे गणेश लोड माधव मानकर चंद्रकांत अंधारे गोडफोडे जान्हवी डोंगरे, संतोष डोंगरे, अनिल मुरूमकार, आशिष पवित्रकार, आकाश ठाकरे, अभिजित कडू, संतोष डोंगरे, उमेश श्रीवास्तव,अतुल गोंधळेकर, शुभम चंदन, अतुल अग्रवाल, ऋषीकेश पोकळे, राजकीरण पवार, आशिष कीर्तन, योगेश फुसे, प्रकाश पोहनकर, गब्बर शर्मा, विजय टिकर, विजय मदनकार, अभिमन्यू नळकांडेगणेश अंधारे, गोपाल मूळे, मनिष बुंदेले, वैकुंठ ढोरे, विनोद मापारी,श्रीकांत गावंडे, सचिन कराळे, संग्राम इंगळे, मयुर जाधव,सचिन देशमुख, संजय झाडोकार,दिलीप भरणेरितेश जामनारे,अभिषेक भगत, उत्तर मंडळ श्री राजेंद्र जी गिरी रमेश जी करीहार टोनी जयराज उज्वल बामणेटसौ शकुंतला ताई जाधव रंजना पवार अविनाश जाधव अनिताताई राजेश चौधरी कल्लू अहेरवाल सोनू क्षीरसागर वामनजी भिसे कैलास रणपिसे राहुल चौरसिया आनंद कदम नितीन राऊत बबलू ओवाळ रुपेश यादव रवी यादव टोनी जयराजसंतोष पांडे, मनोज साहू, चंद्रकांत रूपारेल, संतोष अग्रवाल,विक्की ठाकुर,कृष्णा पांडे, संतोष डोंगरे, नितेश पाली, जानवी डोंगरे,राहुल चौरसिया, आनंद कदम, चांद खान, जमीर खालाला जोगी, नरेंद्र गवलीसंजय गोटफोडे, राजेश पावडे, आनंद बलोदे, सचिन कराळे, वैभव मेहरे भूषण इंदोरिया, केशव हेडा आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आधी कार्यकर्ता उपस्थित होते.