वासनेच्या अधीन असलेल्या माणसाला कशाचेही भान राहत नसते, त्यातूनच बलात्कारासारख्या घटना घडतात. अशीच एक घटना अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून, दोन जणांनी चक्क मूकबधिर असलेल्या एका ६५ वर्षीय महिलेला दारु पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून चान्नी पोलिसांनी बलात्काराची गुन्हे दाखल करत अत्याचार करणाऱ्या या दोघांनाही गजाआड केलं आहे. सदर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील सावरगाव मधील मूकबधीर असलेल्या ६५ वर्षीय महिलेला १७ जुलैला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विनोद लठाड आणि निलेश बोरकर या दोघांनी दुचाकी वाहनावर बसवून नेले. त्यानंतर तिला धमकावून बळजबरीने दारु पाजली. अन् तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यानंतर तिला रात्री साडे नऊ वाजता सोडून दिले.
दरम्यांन, या महिलेला काल सोमवारी सकाळी असह्य त्रास झालाय, त्यानंतर आपल्यावर घडलेला प्रकार आठवला अन् हा घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितला. त्यानंतर नातेवाइकांनी पीडित महिलेला घेवून चान्नी पोलीस स्टेशन गाठले अन् फिर्याद दाखल केली. यावरून चान्नी पोलिसांनी सावरगाव येथील आरोपी विनोद लठाड व नीलेश बोरकर या दोन जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांनी या दोघांना अवघ्या दोन तासात अटक केली. आज या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २२ जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनवाली. या संदर्भात अधिक तपास मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश महाजन, सुधाकर करवते, दत्तात्रय हिंगणे करीत आहे.