अकोला दि.20 : कौशल्य विकास प्रशिक्षणातून रोजगार-स्वयंरोजगार प्राप्त करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो, त्यामुळे युवक युवतींनी कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
जागतिक युवा दिन कौशल्य दिनाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, येथे मुख्यमंत्री महाआरोग्य अभियानाअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्याअधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये या होत्या. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त द. ल. ठाकरे, प्रशिक्षण समन्वयक डॉ अनंत धनवटे, डॉ. राहूल इंगळे, शासकीय प्रशिक्षण संस्थेचे (मुलांची) प्राचार्य प्रकाश जयस्वाल, पातूर येथील शासकीय प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुनिल घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात शासकीय प्रशिक्षण संस्था (मुलींची) अकोला येथील शुभांगी ठोसरे व सुनिता गोळे यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाची माहिती दिली.