• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Wardha Flood : वर्धा जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, शाळा, महाविद्यालयांना सुटी, अनेक गावांचा संपर्क तुटला

Our Media by Our Media
July 19, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य, वाहतूक, शिक्षण
Reading Time: 1 min read
100 2
0
Wardha Flood

Wardha Flood

20
SHARES
732
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

वर्धा : वर्धा (Wardha ) जिल्ह्यात रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक गावांना पुराचा वेढा दिलाय. पावसामुळे जिल्ह्याच्या शाळा (school) महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने पावसाची तीव्रता पाहता हा निर्णय घेतला. जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद आहेत. हिंगणघाट (Hinganghat) तालुक्यातील अलमडोह, मनसावली, सोनेगाव, कान्होली या गावांना पुराचा वेढा आहे. देवळी, सेलू (Selu) तालुक्यातीलाही अनेक गावांचा संपर्क तुटला. आर्वी तालुक्यातील सोरटा, पानवाडी सह काही गावात पाणी शिरला. या गावांना चाहूबाजूनी पुराने घेरले. सतत सुरु असलेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. नागरिकांना उंचीवर थांबायचे आवाहन प्रशासनानं केलंय. गावाला संपूर्ण बाजूने पूर असल्याने बचावकार्यासाठी अडचण निर्माण होत आहे.

वर्धा जिल्ह्यात 12 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हिंगणघाट, देवळी, वर्धा, आर्वी तालुक्यातील नदी काठावरील गावांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यशोदा नदीला पूर आल्याने सरुळ, टाकळी, आलोडा, अलमडोह, भोजनखेडा, चाणकी गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय. वर्धा-राळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. आर्वी तालुक्यातील बाकळी नदीला पूर आल्याने वर्धमनेरी येथील पूल पाण्याखाली गेलाय. आर्वी – तळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय.

आमदार कांबळेंनी मुख्यमंत्र्यांशी साधला संपर्क

वर्धा जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुलगाव, देवळी विधानसभा मतदारसंघाच्या अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. हिंगणघाट, देवळी आणि वर्धा तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्यात आहे. या नागरिकांना रेस्क्यू करण्यासह तात्काळ मदत गरजेची आहे. यामुळे आमदार कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. थेट जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत मदतीचे आदेश दिले. मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याकरिता एनडीआरएफ आणी एसडीआरएफच्या तुकड्या सुद्धा बोलाविण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे मतदान असल्याने मुबंईला उपस्थित राहणे गरजेचे आहे. यामुळे मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना पुराच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचनाही मी दिल्या आहे, अशी माहिती आमदार कांबळे यांनी दिली.

Tags: HinganghatSchoolSeluvillageswardhaWardha Flood
Previous Post

पर्जन्यमानः मदत व बचाव कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Next Post

Monsoon Session : कामकाज दिवसभरासाठी तहकूब; वाढती महागाई व जीएसटीवरून गदारोळ

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
Monsoon Session : कामकाज दिवसभरासाठी तहकूब; वाढती महागाई व जीएसटीवरून गदारोळ

Monsoon Session : कामकाज दिवसभरासाठी तहकूब; वाढती महागाई व जीएसटीवरून गदारोळ

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कर्ज योजना ; इच्छुक लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविले

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कर्ज योजना ; इच्छुक लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.