तेल्हारा (प्रतिनिधी)- गाव म्हणा की शहर यासाठी स्वतंत्र अशी कायद्याने नागरिकांच्या समस्या तसेच प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडल्या जातात मात्र लोकप्रतिनिधी फक्त नावालाच उरले असून सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात तर प्रशासनातील अधिकारी सुद्धा सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे डोळेझाक करतात.
सविस्तर वृत्त अशी की गेल्या काही वर्षांपूर्वी तेल्हारा शहरातील शेगाव नाका ते मालेगाव नाका पर्यँय काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले मात्र नागरिकांना त्रास होनार नाही याबाबत काळजी घेण्यात आली नाही. रस्त्याचे काम झाले मात्र त्यामधील दुवा म्हणजे दोन रस्त्यामधील फरक हा बुजवण्यात आला नसल्याने अनेक नागरिकांचे अपघात झाले.
सदर रस्त्यावर दोन मोठे विद्यालय असून हजारो विद्यार्थी दरोरोज ये जा करीत असतात अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या सायकली या रस्त्यांच्या भेगा मध्ये अडकून दुखापत होत असल्याचे नित्याचे झाले आहे अशातच या रस्त्याच्या कडेला असणारे व्यावसायिक यांनी स्वतः लोक वर्गणी करून दि १५ जुलै च्या रात्री स्वतः संत तुकाराम महाराज चौक ते सेठ बन्सीधर विद्यालय पर्यंत च्या रस्त्यामधील भेगा भुजवल्या त्यामुळे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी जे करू शकले नाही ते सामान्य नागरिकांनी करून दाखवले सद्या न प मध्ये प्रशासनाचे अधिकारी न प चा गाडा चालवीत असून शेगाव नाका ते माळेगाव नाका पर्यंतच्या रस्त्यमधील भेगा बुजवण्यात यावे अशी शहरवासीयांची मागणी केली जात आहे प्रशासन पाऊले उचलणार की बघ्याची भूमिका घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.