• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यातील आठ शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

Our Media by Our Media
July 11, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, विदर्भ, शिक्षण
Reading Time: 1 min read
86 1
0
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
29
SHARES
623
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.11:  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त जिल्ह्यातील आठ मुलामुलींच्या शासकिय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांनी दि. 15 जुलैपर्यंत तर, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन समाजकल्याणचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यानी केले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अकोला, मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृह अकोला, गुणवंत मागासवर्गीय मुलाचे शासकीय वसतिगृह अकोला, 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अकोला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह ता.अकोट जि.अकोला, आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह ता.अकोट जि. अकोला, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह ता. मुर्तिजापूर जि. अकोला, मागासवर्गीय मुलाचे शासकीय वसतिगृह ता.बार्शिटाकळी जि. अकोला या आठ शासकीय वसतीगृह सुरु असून यातील चार मुलांचे तर चार मुलींचे वसतीगृहाचा समावेश आहे. जिल्ह्यातील  शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शालेय विद्यार्थी, इयत्ता दहावी व अकरावी उतीर्ण तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक वा व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या प्रवेशित विद्यार्थ्याना या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये इयत्ता आठवी पासून ते पुढील  अभ्यासक्रमाकरीता प्रवेश अर्ज वाटपाची प्रक्रिया सुरु झाली आहे. शालेय विद्यार्थ्यासाठी शुक्रवार दि. 15 जूलैपर्यंत तर इयत्ता दहावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. 30 जुलैपर्यंत आणि बी.ए.,बी.कॉम.,बी.एस.सी. अशा बारावी नंतरचे अभ्यासक्रमांकरीता प्रथम वर्षाचे  पदविका,पदवी,एम.ए.,एम.कॉम,एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत ही दि.24 ऑगस्टपर्यंत आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नास्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यांत येतो. विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल तेथूनच अर्ज प्राप्त करुन विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज सादर करावा. विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहित वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह संबंधित वसतिगृहातच सादर करावेत. अधिक माहितीकरीता संबंधित शासकीय वसतिगृहात संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात येत आहे.

Tags: AdmissionAkolagovermenthostels
Previous Post

अमरनाथ यात्रेला गेलेले प्रवाशी सुरक्षित

Next Post

त्या १६ आमदारांना मोठा दिलासा, सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई नको, सुप्रिम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना सूचना

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
सुप्रिम

त्या १६ आमदारांना मोठा दिलासा, सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई नको, सुप्रिम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना सूचना

अकोला-  मोठा भाऊ ठरला लहान भावाचा कर्दनकाळ, उरळ पोलिसांची उत्तम कामगिरी आरोपीला अटक

अकोला- मोठा भाऊ ठरला लहान भावाचा कर्दनकाळ, उरळ पोलिसांची उत्तम कामगिरी आरोपीला अटक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.