तेल्हारा (प्रतिनिधी)– शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच पुणे महाराष्ट्र राज्य बाजार संघ माजी संचालक यांच्या निवासस्थानी घरी नसतांना चोरी झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील भोकर येथील रहिवासी तसेच तेल्हारा शहरात मुख्य रस्त्यालगत आपल्या निवासस्थानी राहणारे माजी सभापती सुरेश धोंडीराम तराळे यांच्या घरी चोरी झाली असून ते गेल्या काही दिवसांपासून पुणे येथे आपल्या परिवारासोबत गेले होते दि ६ जुलै रोजी घरी आले असता त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा खुला दिसला आत गेले असता चोरी झाल्याचे लक्षात आले असता लगेच याबाबत तेल्हारा पोलिसांना अवगत केले त्यानंतर पोलिसांनी भेट दिली मात्र अद्याप दि ८ जुलै रोजी पर्यँय गुन्हा दाखल झाला नव्हता आज ८ जुलै रोजी फिर्यादी स्वप्नील तराळे ह्या सभापती पुत्र यांनी दुपारी तक्रार दाखल केली आहे .सदर चोरीचे ठिकाण हे बऱ्यासच्या बँका आणि मुख्य अशा रस्त्यालगत असल्याने चोर किती शिरजोर झाले आहेत हे लक्षात येते.मुख्य रस्ता आणि मुख्य म्हणजे पाच च्या जवळपास चोरीच्या ठिकाणावरून बँका आहेत त्यामुळे चोरट्यानी एकप्रकारे पोलिसांना आवाहन दिले आहे