अकोला,दि.८: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शनकेंद्र, अकोला यांचे विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात ३१८ उमेदवारांनी सहभाग घेतला, त्यापैकी १२७ जणांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या संकल्पनेतून आज पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. या मेळाव्यात क्रेडीट ॲक्सेस ग्रामिण प्रा. ली.,अकोला, नमस्ते वेंन्चर प्रा.ली.अकोला, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेड चाकण पुणे, नवभारत फर्टिलयाझर, औरंगाबाद, तसेच बजाज इलेक्ट्रीकल्स लि.पुणे या कंपनी सहभागी झाल्या होत्या.
या मेळाव्यात एकुण ३१८ उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदविला. मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया होऊन त्यात क्रेडीट ॲक्सेस ग्रामिण प्रा. ली.,अकोला या कंपनीने अकोला व बुलडाणा जिल्हाकरीता ५० पदे, नमस्ते वेंन्चर प्रा.ली.अकोला यांनी एकूण २६ पदे, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेड चाकण पुणे यांनी ५० पदे, नवभारत फर्टिलयाझर, औरंगाबाद यांनी ५१, तसेच बजाज इलेक्ट्रीकल्स लि.पुणे यांनी ५० असे एकूण २२७ पदे अधिसूचीत करण्यात आली होती. यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभ्ज्ञागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी तसेच ज्या उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य झाले नाही त्या उमेदवारांकरिता रोजगार मेळाव्याच्या ठिकाणीच नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यानुसार आज मेळाव्यात एकुण ३१८ उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदविला असून एकुण १२७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यांत आली.
या प्रसंगी जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शैक्षणीक गुणवत्ता कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. रोजगार मेळावा यशस्वी होण्याकरिता नरेद्र काकड, गोपाळ भाकरे, मनोज वैद्य, हर्षद भुरभुरे, मनोज वैद्य, अमोल विरोकार, राज बागडे, राहूल तालेवार यांनी परिश्रम घेतले.